Diwali Bonus News | प्रसार माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खूप महत्त्वाची आणि आनंदाची ठरणार आहे. कारण सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. परंतु हा निर्णय एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना यावर्षी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होणार आहे. Diwali Bonus News
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिगृह येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये या संदर्भातील निर्णय घेण्यात आलेल्या असून दरम्यान महाराष्ट्रातील आणखी एका महामंडळ येथील कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तर दिवाळीच्या उंबरठ्यावर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने आपल्या आस्थापना वरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री आणि सागरी मंडळाचे अध्यक्ष नितीश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत 50 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या बैठकीत मंत्री राणे यांनी सांगितलं की, जवळ हे आनंदाचा सण आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी वर्षभर मेहनत घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सागरी मंडळातील अधिकारी आणि कर्मचारी दोघांच्याही चेहऱ्यावरती आनंद फुलाला आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कायम कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50000 रुपये, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रथमच 20 हजार रुपयांचा बोनस देण्यात आला आहे. ही घोषणा ऐकून मंडळातील वातावरण अक्षय उत्सव भरून गेलं. आतापर्यंत फक्त स्थायी कर्मचाऱ्यांनाच लाभ मिळत होता, पण यंदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ही दिवाळीपूर्वी बोनस मिळणार असल्याने त्यांचाही आनंद आता गगनाला मावेना.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा: UPS योजनेत मिळणार NPS सारखे कर फायदे!