farmers new scheme | शेती करणं ही आजही देशातील मोठ्या जनतेची मुख्य उपजिविकेची साधनं आहे. मात्र, या शेतकऱ्याला वेळेवर पीक कर्ज मिळणं हे जितकं आवश्यक, तितकंच कठीण झालं होतं. बँकेचे फेरफटका, कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तरीही वेळेत पैसे मिळतील की नाही याची चिंता हे चित्र सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण आता सरकारनं घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे ही सगळी झंझट संपणार आहे. शेतकऱ्यांना आता त्यांच्या मोबाईलवरूनच पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. आणि तेही अगदी थेट खात्यावर जमा होईल असा दावा केला जात आहे. farmers new scheme
हे पण वाचा | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
आपण सगळ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ या योजनेबद्दल ऐकलं असेलच. ही योजना म्हणजे शेतीच्या डिजिटलरणाची मोठी पाऊल आहे. देशभरातील शेतकऱ्यांची माहिती, शेतजमिनीची कागदपत्रं, लागवड केलेल्या पिकांचा तपशील हे सगळं एकाच ठिकाणी साठवण्याचं काम या योजनेतून केलं जात आहे. आता हीच योजना सरकारने पीक कर्जासाठी उपयोगात आणायचं ठरवलं आहे. म्हणजे काय, तर ज्या शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढले आहेत, त्यांना आता कुठल्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. सगळी माहिती आधीपासूनच डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे, बँकाही लवकर निर्णय घेऊ शकणार आहेत.
मागच्या आठवड्यात केंद्र सरकारच्या वित्त विभाग, कृषी विभाग व इतर उच्च अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी यावर महत्त्वपूर्ण चर्चा केली. यात ‘प्रायोगिक तत्त्वावर’ काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा ‘फार्मर आयडी’, जमिनीच्या कागदपत्रांची नोंद, लागवड केलेल्या पिकांचा तपशील हे सर्व काही आधीच उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा तीच माहिती द्यावी लागणार नाही.
हे पण वाचा | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
सध्याच्या घडीला महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांनी या योजनेत आपलं नाव नोंदवलं आहे. त्यांना आता फक्त मोबाईलवरून पीक कर्जासाठी अर्ज करायचा आहे. हे अर्ज कोअर बँकिंग प्रणाली असलेल्या बँकांपर्यंत पोहोचतील आणि फार्मर आयडीवरील माहितीच्या आधारावर लगेच निर्णय घेता येईल. मंजूर झालेलं कर्ज थेट बँक खात्यावर जमा केलं जाईल. यासाठी बँकांनाही ‘ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्म’वर नोंदणी करावी लागणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूने प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होणार आहे.
या नव्या योजनेचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि मेहनतीची बचत होणार आहे. त्यांना कर्ज मिळण्यासाठी बँकेत रांग लावायची गरज नाही, कधी मिळेल याची चिंता नाही आणि कोणाच्या शिफारशीची गरज नाही. एकदा का माहिती फार्मर आयडीवर आहे, की मग सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक आणि गतीमान होणार आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
इतकंच नव्हे तर, या योजनेच्या माध्यमातून हवामान माहिती, पीक सल्ला, मृदा परीक्षण, कृषी सल्लागार यंत्रणा, सरकारी अनुदान या सगळ्यांशी शेतकरी थेट जोडला जाणार आहे. म्हणजे ही योजना म्हणजे केवळ कर्ज देण्यापुरती मर्यादित न राहता, एक संपूर्ण डिजिटल कृषी व्यवस्थेचा भाग बनणार आहे.
आता ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर काही भागांमध्ये सुरु झाली असली, तरी यशस्वी ठरल्यास ती लवकरच संपूर्ण राज्यात लागू होईल. आणि मग शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून शेतीशी संबंधित सगळी कामं करता येतील अगदी बँकेच्या सह्याशिवाय.