आनंदाची बातमी! या महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा खात्यात ₹15,000 मिळणार; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Sewing Machine Yojana: आज-काल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. अनेक महिला स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. घर खर्च, मुलांचा शाळेचा खर्च आणि संसाराचे ओझे सांभाळताना कधीतरी स्वतःच्या पायावर उभ राहावं स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा अशी अपेक्षा महिलांच्या मनात असते. अशाच महिलांसाठी केंद्र सरकारकडून अतिशय उपयुक्त अशी फ्री शिलाई मशीन योजना राबवली जात आहे. ही योजना म्हणजे गरीब आणि गरजू महिलांसाठी आर्थिक आधार देणारी योजना आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना मोलाची कामगिरी बजावत आहे.

फ्री शिलाई मशीन योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली असून देशभरातील दुर्बल आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते किंवा काही प्रकरणांमध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी थेट 15000 रुपयाचा लाभ लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जातो.

मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे. आजही ग्रामीण भागात हजारो महिला शिलाई कामातून थोडीफार कमाई करून आपला घर खर्च भागवत आहेत. अशा महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोफत शिलाई मशीन देऊन घरबसल्या काम करून थोडेफार पैसे कमवण्याची संधी देण्याचा विचार शासनाने केला आहे. सरकारच्या या योजनेमुळे महिलांसाठी रोजगार निर्माण होईल. Free Sewing Machine Yojana

मोफत शिलाई मशीन योजनेची पात्रता

मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • अर्जदार महिलांचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असावे.
  • महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे.
  • विधवा किंवा दिव्यांग महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
  • काही ठिकाणी शिलाई कामाचे प्रमाणपत्र देखील आवश्यक असणार आहे.
  • अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही कारण शिलाई मशीन चा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो.
Mofat Sewing Machine Yojana
Mofat Sewing Machine Yojana

अर्ज कसा करावा?

या योजनेला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धती उपलब्ध आहेत. तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

  • ऑनलाइन पद्धत

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिलांना सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला https://pmvishwakarma.gov.in भेट द्यावी लागेल. या ठिकाणी पीएम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन साठी अर्जाची सुविधा दिली आहे. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करा.

  • ऑफलाईन पद्धत

ज्या महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी अर्जाचा नमुना प्रिंट करून विचारलेली सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रासह तालुका महिला व बालकल्याण कार्यालयात किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आपला अर्ज जमा करावा. Mofat Sewing machine Yojana

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • वयाचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र/अपंगत्व प्रमाणपत्र/शिलाई कोर्स प्रमाणपत्र

नियम व अटी

  • शासनाकडून या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो.
  • पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • अर्जात दिलेली माहिती खरी नसल्यास लाभ रद्द केला जाऊ शकतो.

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट 15000 रुपये पर्यंत आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते. काही ठिकाणी शासनाकडून मोफत शिलाई मशीन डायरेक्ट दिली जाते. या दोन्ही प्रकारामुळे महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. अलीकडच्या काळात फ्री शिलाई मशीन नावाच्या अनेक बनावटी वेबसाईट सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी अर्ज फी किंवा नोंदणी शुल्क मागितली जाते. लक्षात ठेवा शासनाकडून या योजनेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही. त्यामुळे कोणत्याही इतर वेबसाईटवर अर्ज करून पैसे वाया लावू नका अधिकृत वेबसाईटवरच आपला अर्ज भरा किंवा सरकारी कार्यालयातूनच अर्ज दाखल करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment