दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढले! 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती? जाणून घ्या सविस्तर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price News: दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणानिमित्त बाजारामध्ये सोन्या-चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण या आनंदी सणाच्या मुहूर्तावर लोकांच्या चेहऱ्यावर चिंता असणार आहे. ती म्हणजे सोन्याचे वाढते दर, गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढवत आहे. दिवाळीनिमित्त सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. आपल्या भारतात ही परंपरा पूर्वीपासून सुरू आहे. पण सध्या सोन्याच्या किमतीत होणारी मोठी वाढ सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापासून रोखत आहे. आज आपण या लेखामध्ये आज सोन्याचे दर काय आहे? त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आजचे सोन्याचे दर

आज 9 ऑक्टोबर 2025 रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बाजारात 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 220 रुपयांनी वाढला आहे. म्हणजेच आज 1 तोळा 24 कॅरेट सोने खरेदी करण्यासाठी 1,24,150 रुपये द्यावे लागत आहेत. आणि जर एखाद्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे 10 तोळा सोनं खरेदी करायचे असेल तर तब्बल 12,41,500 रुपये द्यावे लागत आहेत.

आज फक्त 24 कॅरेट सोन्याच्या सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे असं नाही. त्याबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 200 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आता 1 तोळा 22 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी 1,13,800 रुपये द्यावे लागत आहेत. ज्या लोकांना पारंपारिक दागिन्यासाठी 22 कॅरेट सोने खरेदी करायचे आहे त्यांची चांगलीच डोकेदुखी होणार आहे.

24 आणि 22 कॅरेट प्रमाणेच 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या किमतीत 160 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आता एक तोळा 18 कॅरेट सोनं खरेदी करण्यासाठी 93,110 रुपये मोजावे लागत आहेत. एकूणच कोणत्याही कॅरेटचे सोने घ्या. त्यामध्ये दरवाढ झालीच आहे. Gold Price News

आजची चांदीची किंमत

सोन्याच्या दर वाढी बरोबरच चांदीच्या किमतीत देखील आज वाढ झाली आहे. चांदीच्या एक ग्रॅम दरामध्ये एक रुपयाची वाढ झाली आहे. सध्या एक ग्राम चांदी 161 रुपयांना मिळत आहे. एक ग्रॅम मागे एक रुपयाची घसरण थोडी वाटत असली तरी एक किलो चांदी खरेदी करायला गेल्यानंतर तब्बल 1000 रुपये वाढवून द्यावे लागत आहेत. त्यामुळे आता एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तब्बल 1,61,000 रुपये द्यावे लागत आहेत.

दिवाळीनिमित्त सोन्याची किंमत वाढली

आपण दरवर्षीच पाहतो दिवाळी आली का सोन्याचे दर वाढत असतात. याचे कारण असे आहे की दिवाळीनिमित्त अनेक जण सोने खरेदी करू इच्छितात त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत देखील वाढ होते. अनेक भागातील महिलांना सोन्याशिवाय कोणताही सण अपुरा वाटतो. सोन्याचे दर जरी वाढले असले तरी सोने खरेदी करणे थांबणार नाही महिला सोन्याची खरेदी कमी करतील पण सोने नक्कीच घेतील.

सोन्याचे दर का वाढत आहेत?

आर्थिक तज्ञांच्या मते जागतिक बाजारात वाढता डॉलर मूल्य, मध्य पूर्वेतील तणाव आणि गुंतवणूकदाराचा सोन्याकडे कल या सगळ्या गोष्टींमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखीन मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर आकाशाला भिडले असले तरी भारतात सोन्यातील गुंतवणूक वाढत चालली आहे. कारण कितीही भाव वाढला तरी घरात सोन आलं की लक्ष्मी आली असा भाव प्रत्येक मराठी घरामध्ये कायम आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!