Gold Price Today | शुक्रवारी सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे दर चढ-उताराच्या खेळात अडकलेत. विशेषतः आजच्या दिवशी तर गुंतवणूकदार अक्षरशः चकित झालेत, कारण एमसीएक्सवर सोनं तब्बल 930 रुपयांनी स्वस्त झालं आहे!Gold Price Today
हे पण वाचा | सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर
या सगळ्या घसरणीचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये आलेली वाढ आणि इस्राइल-ईराणमधील वाढतं तणाव. या घडामोडींमुळे सोन्यावर ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून जे विश्वास होतं, त्यात घट झाली आहे.
आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते अमेरिकेतील महागाई दर आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पुढच्या पावलांवर. हे आकडे काय सांगतात यावर पुढचा दरनिर्धारण अवलंबून असेल. त्यामुळे सोन्याच्या बाजारात कमालीचा अस्थिरपणा निर्माण झालेला आहे.
शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं 1013 रुपयांनी घसरलं, तर चांदीसुद्धा 408 रुपयांनी स्वस्त होऊन 1,06,347 रुपयांवर स्थिरावली. काल चांदीची किंमत होती 1.06,755 रुपये.
हे पण वाचा | सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा स्पॉट गोल्ड 0.4% ने घसरून 3,313.23 डॉलर प्रति औंसवर आलं आहे. सोन्याच्या वायदेबाजारातही 0.7% घसरण नोंदली गेली आणि दर 3,325.70 डॉलरवर पोहोचले.
📉 सोन्याच्या दरात आज किती घट?
सोन्याचा प्रकार आजचा दर घट
24 कॅरेट ₹98,020 /10 ग्रॅम ₹930 घट
22 कॅरेट ₹89,850 /10 ग्रॅम ₹850 घट
18 कॅरेट ₹73,520 /10 ग्रॅम ₹690 घट
ग्रामनिहाय दर:
ग्राम 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट
1 ग्रॅम ₹8,985 ₹9,802 ₹7,352
8 ग्रॅम ₹71,880 ₹78,416 ₹58,816
10 ग्रॅम ₹89,850 ₹98,020 ₹73,520
मुंबई – पुणे शहरात काय आहे सोन्याचे दर?
22 कॅरेट – ₹89,850
24 कॅरेट – ₹98,020
18 कॅरेट – ₹73,520
सोनं हे नेहमी सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. लग्नसराई सुरू आहे आणि अनेक ठिकाणी लोक खरेदीसाठी विचार करत आहेत. पण दररोज बदलणारे हे भाव सामान्य खरेदीदाराला गोंधळात टाकतायत.
हे पण वाचा | सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर
कोणती वेळ योग्य, कोणता दर योग्य, हे ठरवताना काळजीपूर्वक निर्णय घ्या. सोनं घसरत असलं तरी उद्या पुन्हा वधारेल याचीही शक्यता नाकारता येत नाही.
Disclaimer:
वरील लेखात दिलेली माहिती विविध ऑनलाइन आर्थिक स्त्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सोन्याच्या किंमती वेळोवेळी बदलत असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या.