Gold Price Today: यावर्षी सातत्याने सोन्याच्या दारात वाढ होत असल्यामुळे सोन्याने नवीन विक्रम नोंदवला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर तब्बल एक लाख रुपयाच्या पुढे गेला होता. मात्र आता या किमतीत झपाट्याने घसरण झाले आहे. मागील काही दिवसात तब्बल दहा टक्क्यांनी सोन्याचे दर घसरले आहेत. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 92 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे.
हे पण वाचा | राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती
तुम्हाला तर माहीतच आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीवर सोन्याचे दर अवलंबून असतात. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्याची दिसत आहे. एप्रिल महिन्यात जिथे सोन्याचे दर तीन हजार पाचशे डॉलर प्रति औंस होता. तोच दर आता 3140 डॉलर्स प्रति औंस वर आला आहे. सोन्याचे दर घसरण्यामागे मुख्य कारण म्हणजे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होणे. जागतिक युद्धाच्या तणावामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती मात्र सध्या यामध्ये मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर घसरल्याचे चित्र दिसत आहे. Gold Price Today
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता?
सोन्याच्या किमती घसरण्यामागील कारण
- भारत पाकिस्तान युद्ध ला पूर्णविराम: 12 मे 2025 रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी घोषित झाल्यानंतर प्रादेशिक तणाव कमी झाला आहे. यामुळे सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीतील रस लोकांचा कमी झाला आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरण्यामागे हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
- अमेरिकन बाँड उत्पादनात वाढ: डॉलर ची किंमत पहिल्यापेक्षा मजबूत झाल्यामुळे आणि बॉण्ड वरील व्याजदर 4.5% पेक्षा अधिक झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्या ऐवजी इतर पर्यावर गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.
- अमेरिका चीन व्यापार तणाव: टॅरिफ कमी करण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे वळण्यास प्राधान्य दिले आहे.
- शेअर बाजारात तेजी :जगभरात शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे त्यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत.
- प्रॉफिट बुकिंग: एप्रिल मध्ये दर गगनाला भिडल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी विक्री वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या कमी झाली.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण; पहा आजचे दर..”