सोनं घसरलं चांदी स्थिर! 10 दिवसांत ₹3,500 ची घसरण, आता भाव कुठवर पोहोचला?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today in Marathi | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. अगदी मोजून १० दिवसांत सोन्याचा भाव तब्बल ₹३,५०० रुपयांनी खाली आला आहे. सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी ₹१,०१,००० च्या आसपास होता. मात्र आता तो ९८,००० रूपयांवर घसरला आहे.Gold Price Today in Marathi

ही आकड्यांची भाषा ऐकायला जरी सोपी वाटली, तरी जे कोणी सोन्यात गुंतवणूक करून बसलेत त्यांच्यासाठी ही बातमी काळजी वाढवणारी आहे. कारण, त्यांनी गुंतवलेलं सोनं दररोज आपलं मूल्य गमावतंय.

हे पण वाचा | सोनं पुन्हा चमकलं! 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागतील?

२८ जूनला सोन्यात मोठी घसरण

२८ जून रोजी एकट्या दिवशीच सोन्याच्या दरात तब्बल ₹५५० ची घसरण झाली. सध्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,५०० रुपये इतका नोंदवला जातोय. तर, २२ कॅरेट सोनं ८१,३०० पेक्षा थोडं जास्त दराने मिळत आहे.

दिल्ली, मुंबई, पटना, लखनऊ, जयपूर अशा देशाच्या प्रमुख शहरांतही दर जवळपास सारखेच आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर दिल्ली आणि मुंबईमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोनं ८९,३०० रुपयांना तर, २४ कॅरेट सोनं ९७,४२० ते ९७,५७० रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे.

चांदी मात्र स्थिरच! किंमतीत फारसा फरक नाही

सोन्याच्या तुलनेत चांदीचं वेगळं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीपासून चांदीच्या दरात थोडीफार वाढ होत होती. पण आज, २८ जून रोजी चांदीच्या किंमतीत फक्त ₹१०० ची घसरण झाली आहे. सध्या देशात एक किलो चांदीचा दर १,०७,८०० रुपये इतका आहे. म्हणजेच, गुंतवणुकीच्या दृष्टीने चांदी सोन्याच्या तुलनेत थोडी स्थिर आहे, असं म्हणायला हरकत नाही.

खुशखबर! सोनं तब्बल 1600 रुपयांनी घसरले; आजचे 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर तपासा…

भाव ठरतो कसा?

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो  “सोनं चढतं-घटतं का?” याचं मुख्य कारण जागतिक बाजारपेठ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं महाग झालं की भारतातही दर वाढतात. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य, केंद्र सरकारने लादलेले कर, आर्थिक अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती यांचा देखील प्रभाव पडतो.

सोनं ही भारतात केवळ गुंतवणुकीची गोष्ट नाही, तर आपल्या परंपरेचा भाग आहे. लग्नसराई, सण-उत्सव अशा वेळी लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. पण सध्या जसा दर घसरतोय, तसा लोकांमध्ये संभ्रमही वाढतोय. कोणाला वाटतं की अजून थांबूया, भाव आणखी खाली येतील; तर कोणाला वाटतं आता घेतलेलं बरा.

सामान्य माणसाच्या मनातलं गणित

शेतकरी असो वा नोकरी करणारा, प्रत्येकाच्या घरात सोनं ही भविष्याची शाश्वत बचत मानली जाते. पण आज जिथं महागाईने डोकं वर काढलंय, तिथं सोन्याचे चढ-उतार गोंधळ उडवणारे आहेत.

सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर

विशेषतः ग्रामीण भागात, जिथं बँकांपेक्षा लोक अधिक विश्वास सोन्यावर ठेवतात, तिथं हे दरदरोज बदलणं म्हणजे गुंतवणुकीला अस्थिर करणं आहे.

काय करावं गुंतवणूकदारांनी?

सध्याच्या स्थितीत कोणतीही घाई करून सोनं विकत घेणं शहाणपणाचं ठरणार नाही. किंमती अजूनही घसरणीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे थोडा संयम ठेवून बाजाराचे निरीक्षण करणं योग्य ठरेल. तज्ञांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय परिस्थिती सावरण्यापर्यंत किंवा डॉलर स्थिर होईपर्यंत सोन्याच्या दरात स्थैर्य येणार नाही.

Disclaimer:

वरील दर विविध शहरांमधील आहेत व बाजारात दिवसेंदिवस बदलत असतात. खरेदीपूर्वी अधिकृत सराफा बाजार अथवा अधिकृत संकेतस्थळावर दर तपासावा.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment