सोनं पुन्हा चमकलं! 3 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागतील?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात थोडा दबाव दिसला होता, पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 1530 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे सोन्याने पुन्हा एकदा 1 लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. Gold Price Today

हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा 2025 चा पावसाळी अंदाज: यंदाचा पाऊस देईल का शेतकऱ्यांच्या आशांना जीव?

सोन्याच्या किमतीतील चढ-उतार

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार दिसून आले आहेत. दहा दिवसांपूर्वी, म्हणजेच 26 मे रोजी, 10 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 97,640 रुपये होती. या महिन्याच्या सुरुवातीला, 1 जून 2025 रोजी, ती 97,310 रुपये होती. याआधी, एप्रिल महिन्याच्या 22 तारखेला सोन्याने 1,01,350 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती 93,000 रुपयांपर्यंत खाली आली होती. मे महिन्यात पुन्हा सोन्याने 99,000 रुपयांपर्यंत मजल मारली आणि आता पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येत आहे.

हे पण वाचा | एकाच दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार? ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळणार मोठा दिलासा

3 जून 2025 रोजीचे सोन्याचे दर

आज, 3 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

22 कॅरेट सोने:

  • मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: 90,610 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी: 90,640 रुपये प्रति 10 ग्रॅम

हे पण वाचा | काही बाजारात उन्हाळी कांद्याला जोर; पण इतर बाजारातील स्थिती काय? जाणून घ्या..

24 कॅरेट शुद्ध सोने:

  • मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: 98,850 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी: 98,880 रुपये प्रति 10 ग्रॅम (टीप: 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 1 लाखाच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

18 कॅरेट सोने:

  • मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव: 74,140 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • नाशिक, लातूर, वसई-विरार, भिवंडी: 74,170 रुपये प्रति 10 ग्रॅम

हे पण वाचा | सरकारचा मोठा निर्णय! जून महिन्यात मिळणार 3 महिन्यांचे रेशन..

सध्या सोन्याची किंमत वाढत असल्याने, गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांसाठीही ही एक महत्त्वाची वेळ आहे. सोन्याची किंमत पुन्हा 1 लाखाचा टप्पा कधी पार करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “सोनं पुन्हा चमकलं! 3 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागतील?”

Leave a Comment