Gold Rate | धनत्रयोदशीला सोन्याच्या भावात तुफान घसरण, तुमच्यासाठी आनंदाची बातमी!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate | सोने खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे, जर तुम्ही लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची ठरणार आहे कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. धनत्रयोदशी ही घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये एक उत्साह वाढलेला आहे आणि मार्केटमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळत आहे सध्या नवीन दर काय आहेत हे एकदा आपण जाणून घेऊया. Gold Rate

आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे भावात घसरण पाहायला मिळाली आहे, तर याचबरोबर चांदीचे भावात देखील घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. इतिहासात देखील एवढी मोठी वाढ सोन्याच्या भावात कधीच पाहायला मिळाली नाही, सोन्याच्या दरात तब्बल पन्नास हजार रुपयांची तर चांदीच्या दारात 90 हजार रुपयांची वाढ झाली.

गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचे दर हे 81 हजार रुपये होते, यंदा तर हे जीएसटी सह एक लाख तीस हजार रुपयांच्या वर गेलेले आहेत मग तुम्ही विचार करा हे दर किती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

गेल्या वर्षी चांदीचा दर 85 हजार रुपये होता तर यंदाचा दर एक लाख 75 हजार रुपयांवर आहे. सोन चांदी खरीदारांसाठी एक दिलासा मिळालेला आहे आज मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. उद्या पंधरा मिनिटात चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. एका दिवसात चांदीमध्ये सहा हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

सोने घसरणीनंतर विना जीएसटी एक लाख 28 हजार रुपयांवर आले तर चांदी विना जीएसटी एक लाख 69 हजारांवर आली आहे. सोयाने चांदीच्या दरात झालेली वाढी ग्राहकांना परिणामकारक ठरली असून यांना दिवाळीमध्ये खरेदी करणाऱ्या महिलांचे बजेट बिघडलं होतं.

धनत्रयोदशीला मुहूर्तावरती अनेक महिला सोनसांदी खरेदी करत असतात, परंतु आता घसरणीमुळे महिलांमध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे परंतु पुढील काळात दर कसे राहतील हे देखील पाहणं गरजेचं आहे.

हे पण वाचा |  सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर 

Leave a Comment