ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आले नाही, त्यांनी फक्त या’ गोष्टी करा, अनुदान जमा होईल..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Heavy rain compensation grant: आपल्या भारत देशाचा कणा शेतकरी असला तरी शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी रोजच नवीन संघर्ष करावा लागत आहे. निसर्गासोबत दोन हात करून आपली शेती अतोनात कष्ट करून उभी करावी लागत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई साठी सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र अजूनही अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. पावसाने उध्वस्त झालेल्या शेतात उभा राहून आजही शेतकरी मोबाईलवर एसएमएस आला आहे का हे शोधत आहे.

मात्र शेतकरी मित्रांनो काळजी करू नका सरकारने अनुदानाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. फक्त तुमच्याकडे काही छोट्या गोष्टी अपूर्ण असतील तर त्या पूर्ण झाल्या की रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आज आपण या लेखांमध्ये तुमच्या बँक खात्यात नुकसान भरपाई अनुदान कशामुळे जमा झाले नाही याची कारणे जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या अनुदानाची स्थिती तपासणी आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अनुदानाची स्थिती कशी तपासावी? चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

अनुदानाची स्थिती कशी तपासावी?

सरकारच्या अधिकृत पोर्टलवर अनुदानाची स्थिती तपासता येते. त्यात चार प्रमुख प्रकार आहेत.

  • Payment rejected — पेमेंट नामंजूर

जर तुमच्याकडे अशी स्थिती दिसत असेल तर त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे aadhar seeding किंवा ई केवायसी पूर्ण नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा परिस्थितीत काय करावे? सर्वप्रथम आपल्या बँकेत जा, त्यानंतर Aadhar seeding and Aadhar mapping या दोन्ही गोष्टी पूर्ण करून घ्या. त्यानंतर जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन ई केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्या. हे काम झाले की पेमेंट तुमच्या खात्यात जमा होईल.

  • नाव जुळत नाही (former name mismatch) —

    ही चूक अनेक शेतकऱ्यांकडून होताना दिसते. आधार वरील नाव आणि फार्मर आयडी वरील नाव जुळत नाही. यामुळे देखील तुमच्या खात्यावर नुकसान भरपाई अनुदान जमा होऊ शकत नाही. अशावेळी काय करावे तर सर्वप्रथम आधार कार्ड आणि फार्मर आयडी ची झेरॉक्स घ्या. ती पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करा. नाव दुरुस्तीची नोंद झाल्यावरच पेमेंट तुमच्या खात्यात जमा होईल.

    • Payment successful मात्र खात्यात जमा नाही—

      अनेक वेळा असे होते पेमेंट सक्सेसफुल अशी स्थिती दाखवते पण रक्कम खात्यात जमा झालेली नसते. याचा अर्थ असा की पेमेंट पाठवले आहे पण खात्यात पडण्यासाठी अडथळा किंवा वेळ लागत आहे. अशावेळी काय करावे, ज्या बँकेत आधार लिंक आहे त्या बँकेत जा. पासबुक अपडेट करा. बॅलन्स तपासा बऱ्याच वेळा रक्कम आधीच आलेली असते पण एन्ट्री झालेली नसते.

      • eKYC pending ई केवायसी प्रलंबित—

        अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहे. यामुळे देखील तुमच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत. कारण तुमचा Aadhar authentication पूर्ण नसते. अशावेळी काय करावे, फार्मर आयडी नसेल तर तलाठी कार्यालयात जाऊन फार्मर आयडी काढा. त्यानंतर सीएससी केंद्रावर जाऊन ई केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. हे झाल्यानंतर तुमची फाईल पुन्हा सक्रिय केली जाईल.

        • सामायिक खातेदार असल्यास काय करावे? —

          अनेक गावांमध्ये एकाच जमिनीवर चार-पाच वारसांचे नाव असते. अशावेळी सामायिक खातेदारांची प्रक्रिया थोडी जास्त वेळ चालू शकते. सर्व वारसांचे संमती पत्र पालक अधिकाऱ्याकडे जमा करा हे झाले की तुमच्या अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल. Heavy rain compensation grant

          • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय?—

            वरीलपैकी तुमच्या अनुदानाची जी स्थिती दाखवेल त्याप्रमाणे आवश्यक पाऊल उचला. एकदा आधार शेडिंग नाव जुळणी ही केवायसी संमती पत्र या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या की, तुमची फाईल पुन्हा सक्रिय केली जाईल. पेमेंट प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, आणि काही तासात किंवा काही दिवसात रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

            अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

            Leave a Comment

            error: Content is protected !!