IMD Monsoon Update | महाराष्ट्रावर दुहेरी संकट, येत्या काही तासात होणार धो धो पाऊस, हवामान विभागाचा चिंताजनक अंदाज जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Monsoon Update | राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी देखील एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र मध्ये आगमन झाल्याच्या नंतर पाऊस सुरूच आहे. राज्यातील विदर्भ सोडता अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. यामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे बळीराजा कुठेतरी सुखावलेला आहे. IMD Monsoon Update

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची वाटचाल दमदार झाली व येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रात अति मुसळधर पावसाचा अंदाज देखील देण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्यान दिलेला महाराष्ट्रासाठी हा अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहता येईल. हा अंदाज जाणून घेण्यासाठी सर्वांनी हा लेख काळजीपूर्वक वाचा हा लेख आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करावा.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून यंदा महाराष्ट्रामध्ये वेळ आधीच दाखल झालेला आहे. मान्सून सोमवार पासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागामध्ये दाखल देखील झालेला आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये मान्सून लवकरच आगमन करणार आहे. याबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये पुढील दोन ते तीन दिवसांनी भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधर पावसाचा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. मुसळधार पावसासोबत विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र कोकण व मराठवाडा या विभागासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या भागामध्ये अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. तर विदर्भामध्ये हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने मुंबई बाबत देखील अंदाज वर्तवलेला आहे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

या ठिकाणी नुसता पाऊसच नसून पडणाऱ्या काळात जोरदार वाऱ्याची शक्यता देखील यावेळी हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वाऱ्याचा वेग 50 ते 60 ताशी किमी इतका असणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा अनेक अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच मान्सून लवकरच पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे अशी देखील शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही पुढच्या हवामान अंदाज व येत्या काळात शेती विषयक माहिती बाजार भाव सरकारी योजना शासकीय योजना व ताज्य घडामोडी ची माहिती मिळेल तसेच आमची अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी त्वरित आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!