Ladki Bahin Yojana New Updates: आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, सून, अशा सर्व महिलांसाठी सरकारनं सुरू केलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. या योजनेमुळे महिलांच्या हातात थेट आर्थिक मदत पोहचते आणि त्यांना स्वतःच्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करता येतात. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत दहा हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ ते ३ मे दरम्यान जमा झाला. त्यामुळे आता सर्वांची नजर लागली आहे मे महिन्याच्या ११ व्या हप्त्याकडे मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार?
हे पण वाचा | या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..
अजितदादांनी फाईलवर केली सही, हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेच्या ११ व्या हप्त्याच्या फायलीवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हप्ता वितरित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या आठ दिवसांत म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
पण जर यंदाही उशीर झाला, तर दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर मे महिन्याचा हप्ता याच महिन्याअखेरपर्यंत आला नाही, तर जून महिन्यात मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्र जमा केले जातील. त्यामुळे ज्यांच्या घरी सध्या पैशांची चणचण आहे त्यांच्यासाठी ही थोडीशी चिंता वाढवणारी बाब असली, तरी एक प्रकारचा दिलासा देखील आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता
पात्र महिलांची अपेक्षा आहे की ‘मे’चा हप्ता वेळेवरच मिळावा. अनेक लाडक्या बहिणी या योजनेच्या माध्यमातून घरखर्चाला हातभार लावत आहेत. कुणी गॅस भरते, कुणी मुलांच्या वही-पुस्तकांसाठी वापरते, तर कुणी आजारी सासूबाईच्या औषधांसाठी. त्यामुळे १५०० रुपये वेळेवर मिळणे ही त्यांच्यासाठी केवळ एक हप्ता नाही, तर जगण्याची साक्ष असते. Ladki Bahin Yojana New Updates
आज जेव्हा बाजारात महागाईने तोंड वर केलं आहे, तेव्हा प्रत्येक थेंबाच्या किमतीची जाणीव प्रत्येक गृहिणीला होते. सरकारने वेळेत हप्ते दिले तर त्या लाडक्या बहिणींचं जगणं थोडं हलकं होतं. त्यामुळेच, येत्या काही दिवसांत हप्ता मिळणार की अजून थांबावं लागणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं आहे. “सरकार दरवेळी वेळेवर मदत पोहचवत राहो आणि आपल्या घरातली ‘लाडकी बहीण’ अशाच आत्मविश्वासानं व स्वाभिमानाने जगावे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या तारखेला मिळणार 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये?”