Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC साठी मुदतवाढ, कशी असणार नवीन प्रोसेस?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना दैनंदिन जीवनात केवायसी करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर होती यामध्ये वाढ करून आता 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे माहिती दिली आहे. कोट्यावधी लाभार्थी असलेल्या या योजनेच्या बाबतीत अनेक ठिकाणी पूर, तांत्रिक अडचणी, वेबसाईट स्लो चालणे किंवा ओटीपी प्रॉब्लम यासारख्या कारणांमुळे अनेक महिलांना वेळेत केवायसी करणे शक्य झाले नाही.

महिलांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शासनाने काळजीपूर्वक हा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला घरबसल्या नवीन मुदत वाढीनुसार वेळेत ई–केवायसी करू शकतात. लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागत होते. मात्र ज्या महिलांचे पती किंवा वडील मृत्यू झालेले आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांनी ई केवायसी कशी करावी याबाबत अस्पष्टता होती. आता शासनाकडून त्यावर देखील स्पष्टता देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत असणाऱ्या महिलांनी सर्वप्रथम स्वतःची ऑनलाईन ई केवायसी करावी. त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडीलाचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. अशाप्रकारे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

eKYC कशी करावी?

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर आपला आधार क्रमांक टाका आणि कॅप्चर कोड टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार सोबत जोडलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी मिळेल तो टाकून व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर पती किंवा वडिलांची माहिती भरा आणि आधार द्वारे व्हेरिफिकेशन करून घ्या.
  • त्यानंतर विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने द्या आणि तुमचा अर्ज सबमिट करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा. काही ठिकाणी फेक पोर्टल द्वारे माहिती व पैसे वसूल करण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाईटवर केवायसी करत आहात का नाही याची खात्री करून घ्या. जर वेबसाईट क्रॅश होत असेल तर शांतपणे जवळच्या पोर्टल सहाय्यक केंद्रावर संपर्क करा. सरकारने भरपूर वेळ वाढवून दिली आहे त्यामुळे काळजी नका करू तुमची केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्या. Ladki Bahin Yojana eKYC

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!