Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 तारीख उलटली तरी अजून देखील मिळाला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता कधी मिळणार आणि जो हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार होता तो कधी होणार असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. यावरच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यातील सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तत्कालीन महायुती सरकार साठी गेम चेंजर ठरली आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ सरसकट महिलांना देण्यात आला आहे. मात्र पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता देऊ असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असल्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे. ज्या महिलांनी योजनेच्या निकषात बसत नसतानाही अर्ज केले आहेत त्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..
मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा शेवटच्या दहा दिवसात मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील आठ दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करू असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे नवीन सरकार स्थापन झाल्यावर 2100 रुपयाचा हप्ता मिळणार होता. मात्र तीन महिने उलटूनही अजून एकवीस रुपयाचा हप्ता मिळाला नाही असाच हवा लाडक्या बहिणच्या वतीने करण्यात येत आहे. याचे अचूक उत्तर अजूनही सरकारने दिले नसले तरी राज्याच्या नवीन अर्थसंकल्पानंतर याविषयी तरतूद करून नवीन आर्थिक वर्षात हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार होत आहेत. राज्याच्या तिजोरीवर याचा अतिरिक्त भर पडत असल्यामुळे ही योजना बंद केली जाईल अशी चर्चा होत आहे. या चर्चांना स्वतः अजित पवार यांनी ब्रेक लावला असून ही योजना कधीच बंद होणार नाही मात्र निकषात बसत नसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व अर्जाची सविस्तरपणे छाननी सुरू असल्याचे देखील त्यांनी वेळी सांगितले आहे. Ladki Bahin Yojana
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार? पहा सविस्तर..”