मोठी बातमी! लाडक्या बहिणीना मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण आता आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे, त्यामुळे आता तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य उमटले असेल.

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट समोर..

मे महिन्याची प्रतीक्षा संपली!

गेले काही दिवस ‘मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?’ हा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनात घोळत होता. एप्रिल महिन्याचे ₹1500 रुपये 7 मे रोजी खात्यात जमा झाल्यानंतर, मे महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही प्रतीक्षा संपवल्याची घोषणा केली आहे. “लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. अशा शब्दांत त्यांनी ही गोड बातमी दिली आहे. Ladki Bahin Yojana Scheme

आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये महायुती सरकारचा दृढनिश्चय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास हीच या योजनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे. या बळावरच ही योजना भविष्यातही अशीच दमदार वाटचाल करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा | फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना लखपती बनवणार! काय आहे सरकारचा पुढील प्लॅन?

तुमच्या खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 रुपये दिले जातात. मे महिन्याच्या या हप्त्यासह, योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तुमच्या खात्यात तब्बल ₹16,500 जमा झाले आहेत! काही महिन्यांमध्ये, जसे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्रितपणे देण्यात आली होती, त्यामुळे ही योजना तुमच्यासाठी एक मोठा आधार ठरली आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या किंमती 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या बाजारात काय होणार तज्ज्ञांचा सल्ला

या महिलांना मिळतात ₹500

काही लाडक्या बहिणींना मात्र योजनेतून ₹1500 ऐवजी ₹500 मिळतात. यामध्ये अशा महिलांचा समावेश आहे ज्या पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा देखील लाभ घेतात. मे महिन्याच्या हप्त्यासह, या महिलांना आतापर्यंत 11 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. एकंदरीत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण आर्थिक आधार ठरत आहे. जर तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर थोडा वेळ थांबा. लवकरच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

2 thoughts on “मोठी बातमी! लाडक्या बहिणीना मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?”

Leave a Comment