Ladki Bahin Yojana Update : “अक्षय्य तृतीया म्हणजे शुभ संधी… पैशाचा मुहूर्त!” असा विचार करत राज्यातील लाखो लाडक्या बहिणींनी ३० एप्रिलच्या दिवशी मोबाईल हातात घेतला होता. मेसेज, बँक अॅप्स, पासबुक… काहीच शिल्लक ठेवलं नाही. कारण महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा एप्रिल महिन्याचा हप्ता त्या दिवशी खात्यात टाकणार, असं आधीच सांगितलं गेलं होतं. पण झाले काय? अक्षय्य तृतीया निघून गेली… आणि हप्त्याचं नाव-निशाणच नाही! Ladki Bahin Yojana Update
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र काल एक मोठी अपडेट दिली. त्यांनी सांगितलं की, “हप्ता लवकरच येणार आहे.” पण ‘लवकरच’ म्हणजे आज, उद्या की पुढच्या अक्षय्य तृतीयेला, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे अजूनही राज्यातील कोट्यवधी महिलांचं लक्ष एका मेसेजकडेच लागून आहे “आपल्या खात्यावर ₹1500 जमा झालेत.”
महायुतीच्या गेमचेंजर योजनेला ब्रेक का लागलाय?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीआधी महायुतीकडून महिलांना दिलेली मोठी ऑफर होती. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. काही भागात सुरुवातही झाली, पण एप्रिलचा हप्ता यंदा वेळेवर मिळालेला नाही. विशेष म्हणजे हप्ता थेट अक्षय्य तृतीयेला मिळेल, असं मंत्र्यांनी आधीच सांगितलं होतं.
राज्यात महिलांचं एक मोठं वर्ग या योजनेवर अवलंबून आहे. शेकडो महिला रोज सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर एकच प्रश्न विचारतायत “हप्ता कधी येणार?” पण त्याला ठोस उत्तर कुणाकडेच नाही.
मंत्र्यांचं उत्तर, पण महिलांचं समाधान कुठे?
अदिती तटकरे यांनी काल महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सांगितलं, “ही योजना खूप मोठी आहे, सरकारकडून पूर्ण ताकदीने काम सुरू आहे, हप्ता लवकरच येईल.” पण महिलांनी आता त्यांच्या “लवकरच” शब्दावर विश्वास ठेवायचा का, की पुन्हा एकदा ATM बाहेर रांग लावून परत यायचं?
राजकीय हालचाली, पण बहिणींची डोळ्यात वाट!
महायुती सरकारच्या अनेक नेत्यांकडून अजूनही 2100 रुपयांच्या हप्त्याची घोषणाही अधांतरीतच आहे. महिलांचा प्रश्न फक्त ‘₹1500 केव्हा’चा नाही, तर ‘योजना किती नियमित आहे?’ हाही आहे. पंधरवड्याला पैसे, महिन्याच्या अखेरीस खात्यात शून्य, अशा परिस्थितीत सरकारकडून होणारा विलंब महिलांमध्ये नाराजीचं कारण ठरत आहे.
वाट पाहणं थांबेल का?
सध्या तरी सरकारकडून हप्त्यावर कुठलीही बंदी नाही, योजना सुरू आहे, पण अंमलबजावणीचं वेळापत्रक बिघडलेलं दिसतंय. ‘लवकरच’ हप्ता येईल म्हणणं सरकारसाठी सोप्पं आहे, पण महिलांसाठी प्रत्येक दिवस म्हणजे गरजेचा खर्च, घराचं बजेट, आणि शेवटचा ₹10 चा विचार!
(टीप: या बातमीत दिलेली माहिती ही माध्यमातील रिपोर्ट्स आणि अधिकृत विधानांवर आधारित आहे. आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता
