Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेसाठी ३३५ कोटी वळवले, मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना ही आता केवळ सरकारी योजना राहिलेली नाही, तर हजारो महिलांच्या रोजच्या जीवनाचा आधार बनली आहे. निवडणूकपूर्वी सुरू झालेली ही योजना इतकी लोकप्रिय झाली की, महायुती सरकारचा विजय याच योजनेच्या जोरावर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेअंतर्गत महिन्याला १५०० रुपये थेट खात्यात जमा होतात, तेवढाच हातभार घरखर्चाला लागतो. कधी मुलाचं फी भरायचं असतं, तर कधी घरात किराणा आणायचा असतो. पण आता प्रत्येक महिना येतो, आणि बहिणींच्या डोक्यावर एकच प्रश्न असतो “हप्ता केव्हा येणार?”

आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वळवण्यात आला आहे आणि तोही थेट आदिवासी विकास खात्यातून. म्हणजेच, आता मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच खात्यात पडणार, ही दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. यानंतर लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न पडत आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..

हप्ता कधी जमा होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे पर्यंत मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता थोडा उशिरा म्हणजेच मे च्या सुरुवातीला आला होता. त्यामुळेच बहिणींच्या मनात मे हप्त्याबाबत संभ्रम होता. आता सरकारी यंत्रणा कामाला लागली असून निधी वळवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एवढेच समोर येत आहे की, मे महिन्याचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही फसव्या बातमींना बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे पण वाचा | मान्सूनचं आगमन! काळ्या ढगांची गर्दी, पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा…

योजनेच्या नावाखाली इतर खात्यांचा खर्च?

सर्वसामान्य महिलांना १५०० रुपये दिले जात असले तरी सरकारला दरमहिन्याला कोट्यवधींचा खर्च उचलावा लागतो. यासाठीच आता आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जमाती उपयोजनेसाठी २१ हजार कोटींची तरतूद होती. त्यातील ६७१ कोटी ४० लाख रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेत. हे पाहता योजना किती खर्चिक आहे हे स्पष्ट होते. Ladki Bahin Yojana Update

हे पण वाचा | फक्त आधार कार्डावर मिळवा 10 हजार रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अर्ज कसा करावा..

योजना खरंच फायदेशीर का?

आज लाखो महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत, हे खरं आहे. पण हाच पैसा जर आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा मूलभूत गरजांसाठी वापरला गेला असता, तर दीर्घकालीन फायदे झाले असते, असंही मत अनेक अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काही जण म्हणतात, “आज १५०० मिळतात, पण उद्या आरोग्य केंद्रात औषधं नसतील तर काय उपयोग?” लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनेचे पैसे या योजनेत वळवणे योग्य आहे की अयोग्य हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘लाडकी बहीण योजना’ ही नावासारखीच प्रेमळ वाटते. घरातील बायका, आई, बहिणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर १५०० रुपये आल्यावरचा आनंद दिसतो. पण त्यामागचं वास्तव थोडं कठोर आहे. शासनाच्या तिजोरीवरचा ताण वाढतो आहे, इतर खात्यांचा पैसा वळवला जातो आहे. हे थांबवायचं असेल तर योजनांची फेरआढावा घेऊन अधिक शाश्वत उपाययोजना करणं आवश्यक आहे. ३१ मेपर्यंत तुमच्या खात्यात १५०० रुपये खटाखट जमा होतील, पण त्यासाठी सरकारने कुणाचा निधी कमी केला आहे, हे लक्षात ठेवायला हवं. आपल्यासाठीच नाही, तर भविष्यातल्या पिढ्यांसाठीही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेसाठी ३३५ कोटी वळवले, मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार..”

Leave a Comment