लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: मे महिना संपायला आता फक्त आठवडाभरचा वेळ उरला आहे. पण अजूनही आपल्या लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. नेहमीप्रमाणे महिना उजाडला की १५०० रुपयांची वाट बघणाऱ्या लाखो महिलांच्या मनात आता अस्वस्थता आहे. कारण दर महिना येणाऱ्या या हप्त्यावरच कुठे मुलाचं दूध, कुठे घरातला किराणा, तर कुठे वीजबिल भरायचं असतं. पण या मे महिन्यात मात्र महिलांना केवळ वाटच बघावी लागतेय.

हे पण वाचा | सोनं खरेदीसाठी आजचा दिवस खास! सोन्याचा दर घसरला, ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण

कधी येणार पैसे?

अनेक गावांमध्ये महिलांनी सतत बँक किंवा पोस्ट ऑफिसची फेरी मारायला सुरुवात केली आहे. एखादीला वाटतं “कदाचित आज जमा झाले असतील!” पण समोर मशीनवर शून्य शिल्लक दिसते आणि निराशा पदरात पडते. काहींनी तर मोबाईलवर बँकचे मेसेज वारंवार चेक करत बसणं सुरु केलं आहे. घरात नवर्‍याची मजुरीच अनियमित, आणि शेतात पाणी नाही – अशा स्थितीत हा हप्ता महिलांसाठी ‘मदतीचा हात’ ठरतो. पण तोच जर वेळेवर मिळाला नाही, तर जीवनाचं गणितच कोसळतं.

हे पण वाचा | आज या राशींवर शनीदेवाची कृपा होणार; वाचा आजचे तुमचे राशिभविष्य

येत्या आठवड्यात पैसे मिळण्याची शक्यता

महिला व बालविकास विभागाकडून अद्याप मे महिन्याच्या हप्त्यावर कोणतीही ठोस घोषणा आलेली नाही. मात्र खात्रीलायक सूत्रांनुसार, येत्या आठवड्यात म्हणजेच मे अखेरीस पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून लवकरच याबाबत घोषणा होईल, असंही बोललं जात आहे. पण तोवर महिलांना वाट पाहण्यावाचून पर्याय नाही. “जर पैसे नाही आले, तर जूनमध्ये दोन्ही महिन्याचा हप्ता मिळेल का?” असा प्रश्न महिलांना पडला आहे.

हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे. काही महिलांना अशीही आशा आहे की जर मे महिन्याचा हप्ता यंदा वेळेवर आला नाही, तर जूनमध्ये दोन हप्ते मिळतील म्हणजेच ३००० रुपये एकदम. पण त्यावर सरकारने अद्याप काहीही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे सध्या फक्त तर्क आणि चर्चाच सुरू आहेत. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार

अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु

दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेत बोगस अर्जांची संख्या वाढल्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. काही महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता सरकारने निकषांनुसार पात्र नसलेल्या अर्जदार महिलांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही महिलांना या महिन्यात हप्ता मिळणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

शेवटी महिलांकडून एकच मागणी केली जात आहे आम्हाला मदतीपेक्षा वेळेवर मदत हवी आहे. सरकारने योजना सुरू करून महिलांना आधार दिला, हे मान्यच. पण वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर तो आधारच हलतो. गरिबांच्या गरजा कधीच थांबत नाहीत – मुलांच्या शाळा, घराचे खर्च, आजारपण याला कुठला ब्रेक नाही. त्यामुळे महिलांची एकच मागणी आहे. “पैसे वेळेवर मिळाले, तरच या योजनेचा खरा अर्थ आहे!”

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा