मान्सूनचं आगमन! काळ्या ढगांची गर्दी, पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather updates: आकाशात काळेकुट्ट ढग जमलेत. कोकण किनारपट्टीवर समुद्र गर्जतोय. झाडांच्या पानांवर थेंब पडू लागलेत. ही फक्त पावसाची सुरुवात नाही, ही शेतकऱ्याच्या काळजाला थोडी थंडीस देणारी सरी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज जाहीर केलं – “मान्सून केरळमध्ये दाखल झालाय!” म्हणजे काय? म्हणजे आता लवकरच महाराष्ट्रातही मेघराजा धडकणार, आणि कोरड्या जमिनीवर हिरवळ उगवणार..

हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..

मान्सून महाराष्ट्रात धडकण्यासाठी सज्ज

गोव्याच्या सीमेला स्पर्श करत मान्सून उभा राहिलाय. पुढच्या दोनच दिवसात तो महाराष्ट्रात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि ते फक्त अंदाज नाही – कारण मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज सकाळपासून आकाश काळं-करडं दिसतंय. कोकणात तर पावसाची पहिली झड लागली देखील आहे. मान्सूनच्या अगोदरच महाराष्ट्रात अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे.

हे पण वाचा | सोनं खरेदीसाठी आजचा दिवस खास! सोन्याचा दर घसरला, ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण

पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा – कोकण, विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट

IMD ने दिलेल्या माहितीप्रमाणे रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हे पूर्वमोसमी पावसाचे आगमन आहे, पण त्याचा जोर मान्सूनसारखाच जाणवतोय. या भागांत ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून रिपरिप सुरू आहे. तिथं उन्हाळी भात शेतात तयार उभा आहे. आणायचा फक्त घरात. पण आता पावसाने त्यालाच भिजवायला सुरुवात केलीय. शेतकरी सांगतो “तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय. वाट पाहतोय थांबतो का ते बघायला.”

हे पण वाचा | फक्त आधार कार्डावर मिळवा 10 हजार रुपयांचे कर्ज; जाणून घ्या अर्ज कसा करावा..

अवकाळीने आधीच झोडपलं

मे महिन्यातल्या अवकाळीने राज्यात हाहाकार माजवला होता. तब्बल २२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालंय. अमरावती, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, जालना इथं मक्याच्या शेंगा, आंब्याच्या बागा, भाताची खाचरं सगळं पानापासून मुळापर्यंत भिजून गेलं. पाऊस आला की लोक आनंदी होतात. शहरातल्या लोकांसाठी पाऊस म्हणजे छत्री, चहा आणि भजी. पण गावाकडं तो शेतकऱ्याच्या आयुष्याशी खेळतो. त्यामुळे पावसाचं स्वागत करायचं, पण डोळसपणे. प्रशासन, शेतकरी आणि आपण सगळेच सज्ज असायलाच हवं.

आता पाऊस आला आहे. निसर्गाची गोड भाषा पुन्हा सुरू झालीय. पण या भाषेत कधी काळजी लपलेली असते, तर कधी आशेचा सूर असतो. शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं आहेत काही वेदनेची, काही समाधानाची. कारण हे थेंब केवळ पाण्याचे नाहीत ते त्याच्या जीवनाचे तुकडे आहेत. Weather updates

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment