Maharashtra Rain Update July 2025 | सध्या जर आपण संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाचं चित्र बघितलं, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते काही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावलीय, पण अनेक भाग अजूनही ढगांकडे डोळे लावून बसलेत. कोकणमध्ये मात्र पावसाने जणू मुक्कामच ठोकलाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत असून पुढील चार दिवस तिथं अजूनही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.Maharashtra Rain Update July 2025
हे पण वाचा | महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…
घाटमाथा, खानदेश, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काळात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे, असंही सांगण्यात आलंय. पण दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भातील बरेच शेतकरी अजूनही “चांगल्या पावसाची वाट” पाहतायत.
याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरतोय. विशेषतः ज्या भागांमध्ये पेरण्या झालेल्या आहेत, तिथल्या शेतकऱ्यांना आता या अंदाजामुळे हुरूप मिळणार आहे.
6 ते 8 जुलै दरम्यान काय होणार?
डख यांनी स्पष्ट केलंय की 6 ते 8 जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होईल, पण तो विखुरलेल्या स्वरूपात असेल. म्हणजेच सर्वदूर एकसारखा पाऊस होणार नाही. कुठे जोरदार, तर कुठे हलका; कुठे एकदम मुसळधार, तर कुठे शिडकाव्यासारखा अशा स्वरूपात हा पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा | मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..
ज्या जिल्ह्यांत पाऊस अधिक राहणार:
पूर्व व पश्चिम विदर्भ मिळून 11 जिल्ह्यांमध्ये या तारखांदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि मराठवाड्यातील जालना यांचा समावेश आहे.
तसंच खान्देश भागात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांनाही या यादीत स्थान आहे.
डख यांचं म्हणणं आहे की, या भागांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरण्या केल्या आहेत, त्यांच्यासाठी हा पाऊस वरदान ठरेल. मात्र सर्वत्र पाऊस होईल, असं समजणं चुकीचं ठरेल कारण तो पाऊस “भाग बदलत” पडणार आहे.
पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
याच अंदाजात विशेषतः पूर्व विदर्भातील ७ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, वाशिम व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
मराठवाडा शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा
मराठवाड्यातही काही भागांत पावसाची शक्यता आहे.
नांदेड, परभणी, जालना, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात विखुरलेला पाऊस पडेल. विशेषतः नांदेड जिल्ह्यात तीन दिवस चांगला पाऊस पडेल, तर परभणी जिल्ह्याच्या ७०% भागात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार कायम
नाशिक, कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि तो पुढील चार दिवस टिकणार असल्याचा अंदाज आहे. संगमनेरच्या पलीकडेही सरींचा जोर कायम राहील, असं डख यांनी नमूद केलं आहे.
जुलै अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस?
डख यांच्या अंदाजानुसार, 13 जुलैपासून हवामानात मोठा बदल होणार आहे. आणि 27 जुलैच्या दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे शेतकरी अजूनही पेरण्या थांबवून बसलेत, त्यांच्यासाठी हा कालावधी निर्णायक ठरू शकतो.
Disclaimer:
वरील हवामान अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक, संबंधित सूत्रे व उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. यात दिलेली माहिती अंदाजावर आधारित असून यामध्ये कालांतराने बदल होऊ शकतो. कृपया शेतीसंबंधित किंवा इतर महत्त्वाचे निर्णय घेताना स्थानिक हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचा विचार करावा. लेखक अथवा प्रकाशक संस्थेची यासाठी कोणतीही जबाबदारी राहणार नाही.
1 thought on “पंजाबराव डखांचा मोठा हवामान अंदाज! या 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस, शेतीच्या बाबतीत दिलासा देणारी बातमी आलीय!”