मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू !  जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2025 Maharashtra :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात तर १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे चित्र दिसतेय. यावर्षी मान्सून केरळमध्ये नेहमीच्या १ जूनऐवजी थोडा आधीच २४ मे रोजी दाखल झाला. महाराष्ट्रातही २५ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली. पण एवढ्यावरच समाधान मानू नका कारण अजून वापसा झालेला नाही.Monsoon 2025 Maharashtra

हे पण वाचा :– राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

पाऊस झाला म्हणजे पेरणी करायची का? 

हवामान खात्याने स्पष्ट सांगितलंय की पुढील ४–५ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पेरणी करण्याची घाई अजिबात करू नका. शेतात पाणी साचणार नाही, याची व्यवस्था आधी करा. कुठे पाणी अडतंय का, कुठे वाहून जाऊ शकतं का, हे नीट पाहा.

हे पण वाचा :– शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन

शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी ? 

शेतात एकदा वापसा (म्हणजे वरचा थर थोडा कोरडा व खाली ओलसर) आल्यानंतर कुळवून मशागत करा. यामुळे उगवलेल्या पिकांवर ताण येणार नाही. पेरणीसाठी योग्य वेळ म्हणजे जमिनीला योग्य ओल, हवेतील तापमान कमी आणि जमिनीतली उष्णता कमी झालेली असणं. उगाच घाई केली, तर पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.या पिकांची पेरणी वापसाच्या नंतर, जमीन योग्य प्रमाणात भिजली कीच करा. खरिपासाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची निवडही तितकीच महत्त्वाची आहे.

हे पण वाचा :– 11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आज पासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 

कपाशी पेरायची? थांबा!

अजून जमिनीतील तापमान कमी झालेलं नाही. अशावेळी कपाशी पेरणी केल्यास किड व रोगांचा धोका अधिक असतो. त्यामुळे अजून काही दिवस थांबा.

फळपिकं आणि जनावरांचीही काळजी घ्या

फळबागांची लागवड करताना उगाच पावसात रोपं लावू नका. जमिनीत पुरेशी ओल व तापमान कमी झालं कीच लागवड करा.जनावरांना गाळयुक्त, दूषित पाणी पाजू नका. सल्फा गोळ्या देऊन बुळकांडीपासून संरक्षण करा. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नका  गडगडाट आणि वीज पडत असेल, तर लगेच सुरक्षित ठिकाणी हलवा.

 अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू !  जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला”

Leave a Comment