Maharashtra Teachers Union Strike | मुलांच्या हातात दप्तर नसेल, वर्गात घंटा वाजणार नसेल, आणि शाळेच्या आवारात संपूर्ण शांतता असेल असं चित्र तुम्हाला ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी पाहायला मिळेल. हो, कारण महाराष्ट्रातील सर्व शाळांना या दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण ही सुट्टी आनंदाची नसून, एक गंभीर कारणामुळे मिळणारी ‘सामूहिक थांबा’ची चिन्ह आहे.Maharashtra Teachers Union Strike
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
शाळा बंद असण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे शिक्षक संघटनांनी पुकारलेलं आंदोलन.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक संघटना आणि इतर विविध शिक्षक संघटनांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारलं आहे. आणि त्याला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.
शिक्षक रस्त्यावर का येणार आहेत?
राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घ्यायच्या आहेत.
गेल्यावर्षी १ ऑगस्ट २०२४ पासून सलग ७५ दिवस आंदोलन केलं गेलं होतं. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या मागण्यांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.
हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!
१४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय (GR) प्रसिद्ध झाला तेव्हा त्या GR मध्ये प्रत्यक्ष निधीची कोणतीही तरतूद नव्हती.
सरकारकडून आश्वासन मिळालं, पण खिशात काहीच पडलं नाही अशी तक्रार शिक्षक संघटनांकडून करण्यात येतेय.
मुंबईच्या आझाद मैदानावर शिक्षकांचा एल्गार!
८ आणि ९ जुलै रोजी हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र जमून सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत.
त्यामुळे या दोन दिवसांत राज्यातील बहुतेक शाळा बंद राहतील.
ही केवळ शिक्षकांची लढाई नाही तर शिक्षणव्यवस्थेच्या अस्तित्वाची मागणी आहे, असं मत शिक्षक नेतृत्वाकडून मांडलं जातंय.
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी काय महत्त्वाचं?
- ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद राहणार आहेत.
- ही सुट्टी सरकारी आदेशाने नाही, आंदोलनामुळे आहे.
- या दिवशी कोणतीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन शैक्षणिक कार्यवाही होणार नाही.
- दहावी व बारावीच्या तयारीच्या विद्यार्थ्यांनी वेळ वाया जाऊ न देता घरी अभ्यास सुरू ठेवावा.
- शिक्षण हे केवळ धडे नाही, तर हक्क आहे!
या संपूर्ण घडामोडीकडे पाहताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे शिक्षक जर असंतुष्ट असतील, तर शिक्षणसंस्था कधीच समाधानकारक चालू शकत नाही.
बोलणं सोपं आहे, पण दोन वेळचं पोट भरत नसलेला शिक्षक मुलांना मूल्यांचं काय देणार?
सरकारने शिक्षणाला ‘प्राथमिकता’ न दिल्यास अशा आंदोलनांना सामोरं जावंच लागणार.
Disclaimer:
वरील माहिती वर्तमान घडामोडींवर आधारित असून, स्थानिक शाळा व शिक्षण संस्थेच्या सूचनांनुसारच अंतिम निर्णय घ्यावा. अधिकृत अपडेटसाठी शाळेच्या किंवा शिक्षण विभागाच्या वेबसाइटची खात्री करावी.