Ladki Bahin Yojana June Payment | राज्यातील अनेक महिलांसाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो जून महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.Ladki Bahin Yojana June Payment
हे पण वाचा | राज्यात 5 दिवस मुसळधार पाऊस! हवामान विभागाचा इशारा कोणते जिल्हे धोक्यात? तात्काळ वाचा!
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल रात्री उशिरा यासंदर्भात ट्विट करत ही दिलासादायक माहिती दिली. खरंतर महिना संपूनही बँक खात्यात पैसे न आल्याने महिलांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण होतं. अनेकजणी बँकेच्या फेऱ्या मारत होत्या. पण आजपासून सुरू झालेल्या या वितरणामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय.
आदिती तटकरे यांच्या ट्विटमध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली आहे. आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये उद्यापासून ही रक्कम जमा होईल.”
हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेत सरकारी घोटाळा? फसवणुकीमुळे सरकार अडचणीत!
या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळतात, आणि तो रक्कम घरात उपयोगी पडते किराणामाल असो, मुलांचं शिक्षण असो, किंवा एखाद्या गरजेची खरेदी असो. ग्रामीण भागातील महिला या योजनेवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
‘सरकारनं पात्रता तपासली, फसवणूक करणाऱ्यांना हटवलं!’
राज्य शासनाकडून योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. ज्या महिलांनी अयोग्य माहिती देऊन अर्ज केला होता जसं की घरात चारचाकी असलेले, सरकारी कर्मचारी, किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला त्यांना योजनेंमधून वगळण्यात आलं आहे.
या प्रक्रियेमुळे खऱ्या गरजू महिलांपर्यंतच सन्मान निधी पोहोचतोय, हे विशेष. आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं आहे, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
‘पैसे आलेत का?’ असं करा खात्री!
तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे ऑनलाइन चेक करता येईल. त्यासाठी फक्त तुमचं आधार लिंक असलेलं बँक अकाउंट उघडा आणि तिथली बॅलन्स किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघा. मोबाईल अॅप, मिनी स्टेटमेंट किंवा आधार एनेबल पेमेंट सिस्टीम (AePS) च्या माध्यमातूनही हे शक्य आहे.
हे पण वाचा | लाडकी बहिण योजनेत सरकारी घोटाळा? फसवणुकीमुळे सरकार अडचणीत!
‘महिलांचा आत्मसन्मान जपणारी योजना’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना ताकदवानपणे पुढे चालली आहे. सरकारचा दावा आहे की ‘लाडकी बहीण’ योजना ही फक्त आर्थिक मदत नव्हे, तर महिलांच्या आत्मसन्मानाची ग्वाही आहे.
आज देशभर महागाईने डोळे फिरवले असताना, १५०० रुपयांची ही मदत खऱ्या अर्थानं महिलांना आर्थिक आधार देणारी आहे. घरातले खर्च भागवणं, मुलांचं शिक्षण, किराणा या प्रत्येक गोष्टीत या रकमेनं हातभार लागतोय.
Disclaimer:
वरील माहिती विविध माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भातील अंतिम व अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या वेबसाईटवर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळवावी. कोणतीही आर्थिक किंवा अर्ज प्रक्रियेची कृती करण्याआधी अधिकृत स्त्रोताची खात्री करावी.