आजचं हवामान: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! हिटवेव आणि अवकाळी पावसाचा इशारा; 7 जिल्ह्यांना अलर्ट जारी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : राज्यावर पुन्हा एकदा हवामानाचं दुहेरी संकट घोंघावत आहे. मागील 24 तासांत हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला असून पुढील 48 तासांत पुन्हा एकदा हिटवेव (उष्णतेची लाट) आणि अवकाळी पावसाचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्यानं राज्यातील सात जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट जारी केला आहे.Maharashtra Weather Forecast

देशाच्या विविध भागांत हवामानावर परिणाम करणाऱ्या प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसत आहे. पाकिस्तानमध्ये तयार झालेलं सायकोलॉनिक सर्कुलेशन, राजस्थानच्या सीमेवर असलेला कमी दाबाचा पट्टा, बांगलादेशपर्यंत पसरलेली पूर्व-पश्चिम दाबरेषा, तसेच उत्तर मध्य प्रदेशपासून गल्फ ऑफ मन्नारपर्यंत असलेली ट्रफलाइन आणि आसाम-त्रिपुरा दरम्यान ३.१ किमी उंचीवर असलेली उत्तर-दक्षिण ट्रफ या प्रणालींचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर जाणवत आहे.

पावसाचा इशारा असलेले जिल्हे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हिटवेवचा इशारा असलेले जिल्हे

तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार आहे. तापमान 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले व शेतकरी वर्गाने दुपारी १२ ते ४ दरम्यान बाहेर जाणं टाळावं.

मुंबई आणि कोकणात कोरडं हवामान

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकण पट्टा सध्या कोरड्या हवामानाच्या प्रभावाखाली आहे. येथे आत्ताच्या घडीला पावसाची शक्यता कमी असून तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

देशभरातील हवामानाचे चित्र

उत्तर भारतात वादळी वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून तापमानात २–३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सध्या स्थिर तापमान असून पुढील काही दिवसांत धुळीचे वारे (Dust Raising Winds) वाहतील. पूर्व भारतात तापमान ४–६ अंशांनी वाढेल, तर तमिळनाडू, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात ‘हॉट अ‍ॅण्ड ह्युमिड’ हवामानाची शक्यता आहे.

पश्चिमी विक्षोभ ओसरतोय

२१ एप्रिलनंतर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी झाल्यानं जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता इतर भागांत पावसाचा जोर ओसरणार आहे. मात्र, दक्षिण भारतात वाऱ्यांसह विजांचा काहीसा प्रभाव राहील. २२ एप्रिलपासून विदर्भ, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश भागात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी हवामान सल्ला

अवकाळी पावसामुळे उघड्यावर ठेवलेलं धान्य, सोयाबीन, कापूस इ. शेतीमाल तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावा. हिटवेवमुळे पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा.टीप: हा हवामानाचा अंदाज IMD आणि Skymet च्या प्राथमिक माहितीनुसार आधारित आहे. स्थानिक अधिकृत हवामान केंद्राच्या सूचनांचे पालन करावे.

हे पण वाचा | या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; नवीन हवामान अंदाज

Leave a Comment