Maharashtra weather today :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्या मनापासून राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. आता हवामान विभागाने एक नवीन अंदाज जाहीर केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. Maharashtra weather today
राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. येणाऱ्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देखील देण्यात आला आहे पुढील आठवड्यामध्ये राज्यात वादळी वाऱ्याचं पावसाचा इशारा हवामान विभागाने वाचवला आहे. शेतकऱ्यांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुजरात व उत्तर कोकणाच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्रकार वारे वाहत आहे याचा परिणाम म्हणून सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक वातावर निर्माण झालेला आहे तसेच हवेची ध्रुनीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे, पावसाचे या अंदाजामुळे महाराष्ट्रात मान्सूनची आगमन यावर्षी लवकरच होणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस :–
राज्य मध्य वादळी पावसाचा इशारा कायम राहणार असून, विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य महाराष्ट्र आणि कोकण वादळी पावसाचा इशारा हमारी रोगांलेला आहे त्याचबरोबर सातारा कोल्हापूर पुणे नाशिक आणि धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजा व मेघगर्जना सह वादळी पाऊस हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेल्या आंदोलनुसार 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
यानंतर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 48 तासात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पुढील चार-पाच दिवस विजा आणि मेघगर्जनासह मुसलदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तनात आली आहे. आणि मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
48 तासासाठी या जिल्ह्यांमध्ये अलर्ट !
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मुंबई ठाणे पालघर भागामध्ये सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि यावेळी काही भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर 29 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे तर ठाणे, रायगड, पालघर ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केला आहे.