पीएम धन-धान्य योजना या 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार?  या शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Dhan Dhanya Yojana :- देशातील उत्पन्नात वाढहोण्यासाठी  सरकार अनेक उपाययोजना राबवित आहे. यामध्ये सरकारने आता पीएम धनधान्य योजना जाहीर केली आहे. ही योजना येणाऱ्या जून महिन्यापासून लागू होण्याची दाट शक्यता आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कामासाठी अनेक विविध सुविधा देण्याच्या अनुषंगाने केंद्रीय कृषि मंत्रालय द्वारे तयारी करण्यात आली आहे. या योजनेबद्दलची येत्या एक-दोन महिन्यांमध्ये अंतिम निर्णय घेऊन अधिकृत घोषणा होणार आहे.

हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

या 100 जिल्ह्यांमध्ये  राबवली जाणार योजना :- 

अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन अगदी कमी प्रमाणात होते, त्यासाठी आता अशा 100 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे जिथे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 2025 26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजना बद्दलची विशेष माहिती दिली होती. तसेच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी देखील लोकसभेमध्ये काही भागातील उत्पन्न क्षमता कमी असल्याचे  स्पष्ट केले होते. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा 

देशाचे अनेक भागांमध्ये शेती उत्पादन वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असते. काय जिल्ह्यांमध्ये उत्पन्न क्षमता कमी आहे, त्यामुळे पीएम धन धान्य  योजनेच्या मदतीने  देशातील तब्बल 1.6 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा डायरेक्ट लाभ मिळणार आहे. PM Dhan Dhanya Yojana

योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आधुनिक सुविधा :- 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या आद्य आधुनिक तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर विशेषता सिंचन सुविधा बोरवेल सौर पंप यासारख्या शेतीसाठी लागणारे अनेक सुविधा शेतकऱ्यांना या योजनेमार्फत मिळणार आहे. अजून तरी ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबवली जाणार आहे याची अधिकृत माहिती समोर आली नाही. तरीसुद्धा कृषी तज्ञाचे मते की या योजनेमुळे शेतीसाठी मोठे फायदा होणार आहे व उत्पादक फायदेशीर ठरणार आहे. 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment