PM Kisan Samman Nidhi Yojana : महाराष्ट्रसह संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांसाठी चालवल्या जात असलेल्या लोककल्याणकारी योजना पैकी एक पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजना पैकी एक आहे. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana
महाराष्ट्रातील लाखो कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत. राज्यात महिला शेतकऱ्यांची संख्या पुरुषांबरोबरच आहे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकार पंतप्रधान किसान सन्मानित योजना राबवत आहे.
यांना दोन हजार रुपये मिळतील
सरकारांतर्गत राहून देणाऱ्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी 2000 रुपये तीन हप्ते मध्ये दिले जातात. महाराष्ट्रातील 90 लाखाहून अधिक शेतकरी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तसेच आता शेतकऱ्यांना यावेळी 19 व हप्ता मिळणार आहे. ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ही रक्कम, जी तीन हप्ते मध्ये उपलब्ध आहे चार महिन्यांच्या अंतराने थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. यावेळी तोच नियम पाळला जाणार आहे.
19 वा हप्ता कधी येणार ?
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत 18 हप्त्यांचा लाभ जमा करण्यात आलेला आहे. आता 19 व्या हप्त्याची वेळ आलेली आहे. हे हप्ते चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. अशा परिस्थितीमध्ये अठरावा हप्ता ऑक्टोबर मध्ये जाहीर झालेला असून त्यामुळे 19 वा हफ्त्याचे चार महिने जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जानेवारी महिन्यात 19 वा हप्ता जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सरकारांतर्गत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.