Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता जानेवारीचा हप्ता अलीकडेच काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा याकडे लक्ष लागलेले आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Update
राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना होत आहे, योजनेचे माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना 25 फेब्रुवारी रोजी मिळालेला आहे. आता फेब्रुवारी चा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली आहे. हा हप्ता कधी जमा होईल आणि यावेळी ₹1500 रुपया ऐवजी 2100 रुपये मिळणार का? याबाबत ही मोठी चर्चा सुरू झालेली आहे.
फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार? (Ladki Bhain Yojana February installment)
सध्याच्या स्थितीला फेब्रुवारी महिन्याच्या आत याबाबत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोणत्याही दिवशी महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 तारखेपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. मात्र, मागील तीन महिन्यांपासून हा आत्ताच शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत आहे. यामुळे याही वेळी 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पैसे मिळण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana Update
₹1500 ऐवजी ₹2100 रुपये मिळणार का? (Will I get Rs 2100 instead of Rs 1500 under the Ladki Bhaeen Yojana? )
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करून ₹2100 रुपये करण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र, निर्णय अध्याप अमलात आलेला नाही. या संदर्भात राज्य सरकारची आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समोर आलेला आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून ही वाढीव रक्कम लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज रद्द- हजारो अर्ज माघारी (Applications of ineligible beneficiaries cancelled from Ladki Bahin Yojana – Thousands of applications withdrawn )
सध्या या योजनेबाबत अनेक मोठ्या चर्चेला उधान आलेले आहे. अनेक महिला या योजनेमधून अपात्र ठरले असल्याचे सध्या चर्चा सुरू झालेले आहे. तसेच अनेक महिलांनी या योजनेतून माघार घेतली असल्याचे देखील समोर आलेले आहे. परंतु या योजनेच्या अटी व नियमानुसार महिलांचे अर्ज अपात्र केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी अपात्र लाभार्थ्याकडून मिळालेला पैसे परत घेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती. त्यामुळे अनेक महिलांनी स्वतःहूनच अर्ज माघारी घेतलेली आहेत.
परंतु राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हटले होते की, अपात्र महिलांनी अर्ज माघारी घ्यावेत, असे आवाहन केल्यानंतर हजारो महिलांनी अर्ज परत घेतलेले आहेत. सध्या पात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू असल्याने या योजनेत पारदक्षता आणण्यासाठी शासन विविध उपयोजना आखात आहे.
लाडकी बहीण योजनेचा महत्व आणि उद्देश (Importance and purpose of Ladki Bhain Yojana)
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असा आहे की, राज्यातील गरिबांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवणे व त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे हे आहे. या योजनेचे माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. महिलांना आर्थिक मदत अवलंबन आणि कुटुंबाच्या खर्चात हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.
सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार?
सध्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये वायरल होत आहेत. परंतु सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. तसेच या योजनेचे हप्तेबाबत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे.
1 thought on “लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार? महिलांना 1500 की 2100 रुपये? महत्वाची माहिती समोर”