पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेली नोंदणी जर बाद करण्यात आले असेल किंवा होल्ड ठेवण्यात आले असेल तर अशा नोंदणी मध्ये कागदपत्र कसे अपलोड करावे? त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. PM Kisan Yojana

हे पण वाचा | मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात शुल्क हटवला; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..

पी एम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी?

  • सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नोंदणीची स्थिती तपासायची आहे.
  • आपल्याला सर्वात प्रथम आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
  • आधार नंबर टाकल्यानंतर बाजूच्या रकाम्यात कॅप्चर कोड टाकायचा आहे.
  • यानंतर व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीची स्थिती समोर दाखवली जाईल.
  • यामध्ये जर आपण योग्यरीत्या कागदपत्राची पूर्तता केली नसेल तर कागदपत्र न दिल्यामुळे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येईल किंवा अर्जात इतर काही त्रुटी असल्यास ते तुम्हाला दिसेल.
  • यामध्ये एक कागदपत्राची पूर्तता व्यवस्थितरित्या केली नसेल तर 2019 पूर्वीच्या फेरफार आणि जमिनीचा सातबारा ज्याची साईज २० केबीपर्यंत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती यामध्ये द्यावा लागेल.
  • तुम्हाला तुमची कागदपत्र अपलोड करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला पुन्हा मेन मेन्यू वर जावे लागेल.
  • या ठिकाणी असलेल्या अपलोड ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर पुन्हा एकदा आधार क्रमांक टाकायचा पर्याय दिसेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चर कोड टाकायचा आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्रावर नवीन संकट! IMD कडून या 9 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा…

  • त्यानंतर मोबाईल नंबर दाखवला जाईल या नंबर वर एक ओटीपी देखील मिळेल.
  • मोबाईल ओटीपी इतर मोबाईल ओटीपी या रकमेत भरायचा आहे.
  • त्यानंतर गेट आधार ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • पुन्हा आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल हा ओटीपी पुन्हा समोरच्या रिकाम्यात टाकायचा आहे.
  • शेवटी सबमिट फोर ऑर्थोंडिकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती विंडोवर दाखवली जाईल.
  • जर या माहितीत आपल्याला काय बदल करायचे असतील ते करायचे आहे.
  • जमीन च्या बाबतीत काही अधिक माहिती आपल्याला समाविष्ट करायचे असल्यास तेदेखील तुम्ही करू शकता.
  • आता आपण केवळ कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
  • स्क्रीनवर दाखवण्यात येणाऱ्या सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी कागदपत्र अपलोड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यामध्ये फाईल निवडा या पर्यायावर क्लिक करून आपण संबंधित कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • यानंतर शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज पुन्हा एकदा सादर झाल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर

1 thought on “पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती..”

Leave a Comment