PM Kisan Yojana :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जून २०२५ या कालावधीसाठीचा २० वा हप्ता येत्या जून महिन्यात वितरित होणार आहे. मात्र, काही त्रुटी अजूनही न भरल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं.
हे पण वाचा: पीएम किसान योजनेला नव्याने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
31 मे पूर्वी करा हे काम अन्यथा मिळणार नाही योजनेचा लाभ :
राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये ३१ मे २०२५ पर्यंत शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण, ई-केवायसी मोहिम, स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नवीन नोंदणी, बँक खात्याचं आधार सिडिंग आणि भूमी अभिलेखांची अद्ययावत नोंद या गोष्टी करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत ही माहिती पूर्ण करणं गरजेचं आहे.
ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपद्वारे चेहरा किंवा अंगठा स्कॅन करावा. ज्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांनी महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधावा.नवीन नोंदणीसाठी फेरफार पोर्टलवर माहिती भरावी लागेल, आणि त्यासाठीही महा ई-सेवा केंद्राशी संपर्क आवश्यक आहे.
हे पण वाचा: पीएम किसान योजनेला नव्याने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
बँक खातं आधारशी जोडण्यासाठी, ज्यांना ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी स्वतःच्या बँक शाखेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये डीबीटी खातं उघडावं.
केंद्र सरकारकडून देण्यात येणारा २० वा हप्ता जूनमध्येच येणार आहे, पण त्याआधी ज्या बाबी अपूर्ण आहेत त्या वेळेत पूर्ण कराव्यात, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कारण, ‘पीएम किसान’चे लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’साठी पात्र असतील.
हे पण वाचा : पी एम किसान योजनेची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा
शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर आता फार्मर आयडी असणंही अनिवार्य करण्यात आलं आहे. जे शेतकरी PM किसान पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत पण फार्मर आयडी नाही घेतला, त्यांना देखील लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे फार्मर आयडी तातडीनं तयार करून घ्यावा.
या दोन्ही योजनांचा लाभ मिळावा यासाठी, ३१ मेपूर्वी सर्व बाबींची पूर्तता करणं अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलं आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा