Pm Kisan Yojana : हे कागदपत्र आहेत का? तरच तुमच्या खात्यावरती जमा होणार pm Kisan चे ₹2000 हजार रुपये?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana: शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पुढचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडे फार्मर आयडी हे कागदपत्र असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही त्यासाठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे वाचा Pm Kisan Yojana

शेतीवर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही मोठा आधार बनली आहे. या योजनेत दरवर्षी ६ हजार रुपये थेट DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. सध्या शेतकऱ्यांना २०व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, जो जून २०२५मध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहू शकतात, अशी धोक्याची घंटा कृषी विभागाने वाजवली आहे. Pm Kisan Yojana

कसल्या चुका झाल्या तर हप्ता मिळणार नाही?

अनेक शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही किंवा फार्मर आयडी तयार केलेला नाही. यामुळे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या PM किसान योजनेचा २०वा हप्ता थांबवला जाऊ शकतो. या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे.

शेतकऱ्यांनी कोणत्या अटी पूर्ण करणं गरजेचं आहे?

1. e-KYC पूर्ण करा

शेतकऱ्यांनी PM-KISAN पोर्टलवर जाऊन मोबाईल अ‍ॅपद्वारे चेहरा किंवा अंगठा स्कॅन करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही, त्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रात किंवा कृषी सहाय्यकांकडे जाऊन KYC करून घ्यावे.

2. नव्या नोंदणीतील त्रुटी दूर करा

PM-KISAN पोर्टलवर फॉर्म भरताना काही चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती फेरफार विभागात जाऊन दुरुस्त करावी. नवीन नोंदणीसाठी देखील mahacenter किंवा pmkisan.gov.in पोर्टलवर जाऊन अर्ज करता येईल.

3. आधार आणि बँक खाते लिंकिंग आवश्यक

तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे बँकेच्या शाखेत जाऊन DBT खातं सुरू करा आणि खातं आधारशी लिंक आहे का ते तपासा. याशिवाय, पोस्ट ऑफिसचं खाते सुद्धा वापरू शकता.

4. फार्मर आयडी मिळवा

राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ हवा आहे त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी तयार करून घ्यावा. अन्यथा, दोन्ही योजनांचे पैसे अडकू शकतात.

जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवली जाणार

कृषी विभागाकडून जिल्हास्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेमार्फत शेतकऱ्यांना आवश्यक सूचना व मदत दिली जाणार आहे. मात्र यासाठी ३१ मे पूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता हवा असेल, तर तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करा. फक्त २-३ दिवस उरले आहेत, त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता कागदपत्र, e-KYC आणि खात्याशी संबंधित सर्व बाबी वेळेत पूर्ण करा. सरकारकडून मिळणारा हक्काचा लाभ चुकवू नका.

(Disclaimer : वर दिलेली माहिती आम्ही विविध माहितीस्त्रोच्या आधारे गोळा केलेले आहे यावर ती विश्वास संबंधित सरकारी वेबसाईटचा उपयोग करा.)

हे पण वाचा :शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

Leave a Comment