PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर तीन महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. हे पैसे अनेक शेतकऱ्यांसाठी खत, बी, बियाणे, औषधे आणि घर खर्च भागवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात. दरम्यान दिवाळीचा सण जवळ आला आहे या सणानिमित्त सरकारकडून या योजनेचा 21 वा हप्ता मिळाला तर शेतकऱ्यांना सण साजरा करण्यासाठी अधिक आनंद मिळेल. त्यामुळे देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार हाच प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. या योजनेअंतर्गत विसावा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. यानंतर पुढचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळणार अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र दिवाळी सारख्या मोठ्या सणानिमित्त शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळाले नाहीत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार? दरम्यान या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
21 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार?
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनिक कामकाज आणि तांत्रिक पडताळणीमुळे हा हप्ता थोडा उशिरा मिळू शकतो. त्यामुळे आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करेल अशी देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यातील काही शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे पैसे आधीच मिळाले आहेत. या राज्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्राधान्य देत केंद्र सरकारने आर्थिक मदत म्हणून 21 व्या हप्त्याचे पैसे आधीच दिले आहेत. महाराष्ट्रासोबत इतर राज्यातील शेतकऱ्यांना मात्र आणखीन थोडा संयम ठेवावा लागू शकतो.
eKYC करणे अनिवार्य
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांचा हप्ता अडकू शकतो. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे न मिळण्याचे हे प्रमुख कारण मानले जात आहे. PM Kisan Yojana
अशी करा ई केवायसी
- सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर eKYC हा पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका.
- मोबाईलवर आलेला ओटीपी भरून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
तुम्ही ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईलवर देखील करू शकता. किंवा सीएससी केंद्रा मार्फत ऑनलाईन पद्धतीने देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. केवायसी केल्यानंतरच 21 वा हप्ता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे काम करण्यास लगेच सुरुवात करावी. असे आवाहन केंद्र सरकार मार्फत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील अनेक पारंपारिक शेती करणारे शेतकरी सरकारच्या या मदतीवर अवलंबून आहेत. खत औषध बियाणे या खर्चासाठी सरकारकडून मिळणारे दोन हजार रुपये मोठा दिलासा देतात. दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात हप्ता मिळाला तर शेतकऱ्यांना त्यांच्या परिवाराची दिवाळी गोड करण्यासाठी हातभार लागेल. मात्र दिवाळीनंतर या योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन वाट पाहावी लागणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 21 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येतील. त्यामुळे दिवाळीनंतरचा काळ शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरू शकतो.