PM Kisan Yojana July 2025 | नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी पी एम किसान योजनेच्या 20 व्या हप्ते ची प्रतीक्षा करीत आहे. याआधी 20वा हप्ता हा जून महिन्यामध्ये येणार होता अशी चर्चा सुरू होती, परंतु जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना हप्ता प्राप्त झाला नाही.PM Kisan Yojana July 2025
हे पण वाचा | PM किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार? अर्ज करण्याची शेवटची संधी, ही कामं तातडीनं पूर्ण करा
आता लाखो शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार ? या योजनेअंतर्गत मात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे. या योजनेचा येणाऱ्या हप्त्याची प्रक्रिया ही शेवटच्या टप्प्यात आली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे ट्रान्सफर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या तारखेला आता जमा होणार आहे शक्यता ?
प्रसार माध्यमाच्या माहितीनुसार, पी एम किसान योजनेचा येणारा हप्ता १८ जुलै २०२५ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मोतीहारी इथं एका मोठ्या कार्यक्रमात या हप्त्याची घोषणा करू शकतात. मात्र, अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही हे लक्षात ठेवा. तरीसुद्धा १८ जुलैच्या आसपास कधीही हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | PM किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार? अर्ज करण्याची शेवटची संधी, ही कामं तातडीनं पूर्ण करा
तुमचं नाव यादीत आहे का? असा करा स्टेटस तपास!
शेतकऱ्यांनो, तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक वेळा नाव नोंद असूनही लाभ मिळत नाही. खाली दिलेली प्रक्रिया फॉलो करा:
1. https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. डाव्या बाजूला ‘किसान कॉर्नर’ या विभागात जा.
3. त्यात ‘लाभार्थी यादी (Beneficiary List)’ या ऑप्शनवर क्लिक करा.
4. तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव भरून रिपोर्ट मिळवा.
5. हवं असल्यास CSC किंवा Self Registration Status वरही क्लिक करू शकता.
6. तिथं तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
7. लगेचच तुमचं नाव, रजिस्ट्रेशन आणि अप्रुव्हल स्टेटस दिसेल.
Disclaimer:
वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून उपलब्ध असलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हप्ता कधी जमा होईल, याबाबतची अंतिम माहिती pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा संबंधित प्रशासनाच्या सूचनांवर अवलंबून असेल. वाचकांनी कोणतीही आर्थिक किंवा योजनेशी संबंधित कृती करण्याआधी अधिकृत स्त्रोताची खातरजमा करावी.