pm kisan yojana list : शेतकऱ्यांच्या घरात थोडीफार आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारनं सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आजघडीला देशातल्या सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह योजनेपैकी एक ठरली आहे. या योजनेतून दरवर्षी ६००० रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये, म्हणजेच प्रत्येकी २००० रुपये, दर चार महिन्यांनी मिळते. मागचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात आला होता, आणि आता पुढचा २० वा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार आहे.pm kisan yojana list
हे पण वाचा : मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक
अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी सरकारी यंत्रणा आपापलं काम करत आहेत. पण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही बाबी वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमचे पैसे अडकू शकतात.
अजूनही अर्ज करू शकता का ?
तुम्ही अजूनही या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे अवैध नाही, तर वैध आधार कार्ड असणं आवश्यक आहे. त्यात तुमचं बरोबर नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती असावी लागते.
हे पण वाचा : पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!
शेती तुमच्या नावावर असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही खरंच शेतकरी आहात हे सिद्ध व्हायला हवं. याशिवाय, निवासी प्रमाणपत्र आणि KYC पूर्ण असणंही गरजेचं आहे.KYC नसेल तर, शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे, लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
पी एम किसान योजनेला नव्याने असा करा अर्ज :
PM किसानसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या ऑनलाइन प्रक्रिया
१. सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. तेथे “New Farmer Registration” या पर्यायावर क्लिक करा.
३. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
४. राज्य निवडा आणि फोनवर आलेला OTP भरा.
५. त्यानंतर, तुमची संपूर्ण माहिती अपलोड करा – जसे की आधार कार्ड आणि बँक पासबुकमधील तपशील.
६. सर्व माहिती नीट भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
हे पण वाचा : पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!
ऑफलाइन अर्ज
ज्यांना ऑनलाइन अर्ज करणं शक्य नाही, त्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन अर्ज भरू शकता. तिथे तुमची कागदपत्रं तपासली जातील, आणि अधिकारी तुमच्याकडून फॉर्म भरून घेतील.
स्टेट्स कसं तपासायचं?
तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर किंवा तुम्ही आधीच लाभार्थी असाल, तर तुमचं नाव यादीत आहे की नाही, किंवा हप्ता आला की नाही, हे देखील pmkisan.gov.in वर तपासता येतं.
हे पण वाचा : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार PM किसान योजनेचा हप्ता ! 31 मे पूर्वी करावे लागणार हे काम
आत्ता मिळायचा असेल तर लवकर करा हे काम ?
शेतकऱ्यांनो, हप्ता मिळवायचा असेल तर ३१ मेपूर्वी सगळी कामं पूर्ण करून घ्या. अर्ज, KYC, बँक खातं आधारशी लिंक, आणि जमिनीची नोंद यात काहीही राहिलं, तर हप्ता अडकू शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा