Rain Alert: भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा एकदा नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. यावर्षी अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल होताना दिसत आहे. दिवसाचं ऊन वाढत असल्यामुळे संध्याकाळी पुन्हा एकदा ढगाची गर्दी होत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तामिळनाडू, केरळा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये 12 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उत्तर पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा इशारा
ऑक्टोबर महिन्यातील पावसाची ही लाट फक्त दक्षिण भारतातच नाही तर ईशान्यकडेही मोठ्या प्रमाणात आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, सिक्कीम, उडीसा, आसाम, मेघालय, मणिपूर, मेघालँड, मिझोरम, आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये आठ ते 11 ऑक्टोबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये 10 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. Rain Alert
महाराष्ट्रात कुठे होणार पाऊस?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तापमानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस कोणाचा चटका वाढत आहे आणि रात्री मात्र आकाशात ढगांची गर्दी होत आहे. पण आता दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण सुरू झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहून अधून मधून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद या भागातही काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती
या काळात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. अनेक भागांमध्ये कापूस सोयाबीन तूर यासारख्या पिकांची काढणी चालू आहे. अशावेळी जर अचानक पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन या भागातील शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. असा सल्ला कृषी तज्ञ यांच्याकडून दिला जात आहे. पावसाचे आगमन कधी होईल हे सांगता येत नाही, पाऊस हा शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो पण अति शेती पिकासाठी घातक देखील ठरतो. त्यामुळे शेतकऱ्याने हवामान बदलला कडे दुर्लक्ष न करता आपल्या शेती पिकाचे नुकसान होण्यापासून रोखणे आवश्यक आहे.