Rain Alert: देशातील हवामानात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये ऊन आणि उकड्याचा त्रास जाणवत आहे तर दुसरीकडे काही भागांमध्ये काळे ढग अजूनही दाटून येत आहेत. भारतीय हवामान खात्याने नुकताच एक मोठा इशारा दिला आहे. पुढील सात दिवस देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
IMD च्या नवीन अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, तेलंगाना, झारखंड आणि ईशान्य भारतात पुढील काही दिवसात नैऋत्य मान्सूनच्या माघारी साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. पण या काळात दक्षिण भारतात मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून ने परतीचा प्रवास सुरू केलेला असून या प्रवासामध्ये अनेक भागांमध्ये मान्सून शेवटचे हजेरी लावीत असतो. Rain Alert
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विशेषता केरळ आणि तामिळनाडूमध्ये 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विजेच्या कडकडाटासह वाऱ्याच्या गडगडाला सह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
13 आणि 14 ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश किनारपट्टीवर आणि यानम प्रदेशात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. दरम्यान लक्षदीप बेटावर देखील बारा आणि 13 ऑक्टोबर रोजी विजेच्या कळकळाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान केरळ, माहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा, आणि तेलंगणा या राज्यात देखील पावसाची हजेरी लागणार आहे. ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरामुळे आणि वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 ऑक्टोबर रोजी ओडीसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड आणि विदर्भात देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिर्झाराम आणि त्रिपुरा येथे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या भागात विजा चमकण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशात हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे ग्रामीण भागातील किंवा शहरी नागरिकांसाठी हा पाऊस त्रासदायक ठरू शकतो. शेतकऱ्यांनी या काळामध्ये आपल्या पिकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अनेक भागांमध्ये सध्या खरीप हंगामातील पिकाची काढणी सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विजेचा कडकडाट होत असताना कोणीही झाडाखाली उभे राहू नये. नागरिकांनी नद्या पुढे आणि तलवाच्या परिसरात जाणे टाळावे.