SBI च्या या खास FD योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस! मिळणार मोठा नफा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI  special FD Scheme :-   जर तुम्ही एक चांगली गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास. आपल्या देशातील एक सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. ग्राहकांसाठी एसबीआयने अमृतसृष्टी आणि अमृत कलश अशा दोन योजना सुरू केल्या आहेत, या दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च आहे.

हे पण वाचा :- FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल

SBI amrut srushti  FD scheme  :-

अमृत सृष्टी एफडी योजना  ही  2024 मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2025 आहे. या योजनेचे माध्यमातून तुम्ही 444 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकतात, या योजनेचे मार्फत ग्राहकांना सर्वसाधारणपणे 7.25% वार्षिक व्याजदर मिळत आहे. म्हणजेच जर तुम्ही या योजनेमार्फत दोन लाख रुपये गुंतवणूक केले तर ते 444 दिवसानंतर   ही रक्कम वाढून तुम्हाला दोन लाख 18 हजार 532 रुपये इतकी मिळणार आहे. 

SBI Amrit Kalash FD scheme :- 

SBI अमृत कलश FD योजनेअंतर्गत  तुम्हाला 400 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत  तुम्हाला सर्वसाधारणपणे 7.10% व्याजदर मिळत आहे व ज्येष्ठ नागरिकांकरिता 7.60% इतके व्याजदर आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला  तुम्हाला चारशे दिवसानंतर दोन लाख पंधरा हजार 562 रुपये मिळणार आहे म्हणजे तुमचा नफा हा 15000 रुपये इतका मिळणार आहे.

या दोन्ही एसबीआयच्या सर्वात खास योजना आहेत जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या जवळच्या एसबीआय बँक शाखेमध्ये जाऊन या योजना बद्दलची सर्व माहिती घेऊ शकतात. त्याचबरोबर तुमचे एसबीआय खाते असेल तर तुम्ही मोबाईल इंटरनेट बँकिंग द्वारे देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. 

अशोक नवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी ते क्लिक करा.

1 thought on “ SBI च्या या खास FD योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस! मिळणार मोठा नफा”

Leave a Comment