Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका पती-पत्नीच्या भररस्त्यातील भांडणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं दिसत आहे, इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांना अक्षरशः रस्त्यावर लोळवलं आहे. हे दृश्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष रस्त्यावर जोरदार भांडताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला महिला पुरुषाचा गळा आवळताना दिसते, तर पुरुष तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानेही महिलेचा गळा पकडलेला आहे आणि तिला सोडवण्यासाठी तिचे केसही धरले आहेत. दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू असावा, कारण ते एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. माणूस महिलेला जमिनीवर पाडतो, पण महिलाही तितकीच चपळ निघाली आणि तिने नवऱ्यालाच खाली पाडून त्याचा गळा दाबून उभी राहिली. या घटनेवेळी आजूबाजूला काय सुरू आहे, याचं त्यांना भानही नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ कोणी शूट केला आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय?
हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @SinghKinngSP या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे, भांडण सोडवण्याऐवजी कॅमेरामॅनने व्हिडिओ काढण्याला प्राधान्य दिलं. यामुळे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये मिश्किलपणे लिहिलं आहे की, “इतिहास साक्षी आहे, कोणत्याही कॅमरामॅनने कधीही कोणाला मदत केलेली नाही.”
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “कॅमेरामॅनचं काम फक्त रेकॉर्ड करणे आहे,” तर दुसऱ्याने गंमतीने लिहिलं आहे, “कॅमेरामॅन मदत करायला गेला असता तर, या व्हिडिओला लाईक्स मिळाले नसते.” अनेकांना मात्र त्यांच्यातील भांडणाचं नेमकं कारण काय होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. Viral Video
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अशाप्रकारे भररस्त्यात होणारी ही हाणामारी पाहून अनेकांना धक्का बसला आहे.