Weather Alert | राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आलेले आहे, ती म्हणजे अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठी अपडेट दिलेली आहे आणि या अंदाजामध्ये त्यांनी राज्यातील 21 जिल्ह्यांना आज अलर्ट जारी केलेला आहे. या आधी सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नळा आणली त्यातच पुन्हा एकदा हवामन खात्याचा हा अंदाज शेतकऱ्यांना मोठा धक्का देणार आहे. ऑक्टोबरला राज्यात पाऊस होणार का? कोणत्या जिल्ह्यात नाही होणार नाही, याची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Weather Alert
राज्यात हवामान खात्याने 3 ऑक्टोबरला राज्यभर पावसाचा इशारा दिला आहे. त्यात 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर इथं हलक्या ते मध्यम पाऊस होईल असं सांगण्यात आलंय. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी हलका पाऊस पडेल, पण सोलापूरला जोरदार वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होणार अशी शक्यता आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आवश्यक काळजी घ्यावी अशी आव्हान देखील हवामान विभागाने केल आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारला देखील पाऊस तर नाशिक, जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भात तर सगळीकडेच म्हणजे नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे.
राज्यात एकूण 3 ऑक्टोबरला पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, पावसाचा जोर वाढेल यामुळे शेतकऱ्यांचे देखील चिंता वाढली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, घराबाहेर निघताना सतर्क रहावं, अशी सूचना हवामान खात्याने दिलेली आहे. आज राज्यातील हवामान कसे राहते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | मान्सूनचा जोर वाढतोय! पण शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नका करू ! जाणून घ्या हवामान खात्याचा सल्ला
1 thought on “Weather Alert | राज्याच्या वातावरण पुन्हा एकदा मोठा बदल, हवामान खात्याचा या 21 जिल्ह्यांना अलर्ट”