Weather News | पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारा हवामान अंदाज, या भागात होणार मुसळधार पाऊस ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather News | गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती, परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने टेन्शन वाढवणारी अपडेट दिलेली आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकरी बांधवांना होऊ शकतो. त्यासाठी हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी वाचा आजचा सविस्तर हवामान अंदाज Weather News

हवामान खात्याच्या अपडेट नुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून ती पुढील दोन ते तीन दिवसात तीव्र होऊ शकते. या प्रणाली मुळे दक्षिण भारतातील राज्यांवर मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे, तर महाराष्ट्र वरही त्याचे अप्रत्यक्ष परिणाम जाणवतील असे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा चिंता लावणारी बातमी आलेली आहे.

महाराष्ट्र मध्ये मागच्या महिनाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी आत्ताच सावरतोय. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काहींचे घर उद्धवस्त झाले. काहींच्या शेतात काही चोरले नाही तर काहींचे जनावर देखील वाहून गेले आहेत. पण हवामान विभागाने पष्ट केला आहे की मान्सूनची परतीची वाटचाल सुरू असली तरी अजून हवामान स्थिर झालेल नाही. बंगालच्या खाडीत तयार होत असलेली ही नवीन प्रणाली पुन्हा एकदा दक्षिण भारतात आणि काही प्रमाणात मध्य भारतात पावसाचा जोर वाढवू शकते.

भारतीय हवामान विभागाच्या नवीन माहितीनुसार, ही प्रणाली म्हणजे ईशान्य मान्सून (Northeast monsoon) आता काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. दरवर्षीप्रमाणे हा मान्सून ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होतो आणि तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. यावर्षी मात्र बंगालच्या खाडी तयार झालेले चक्रीवादळ या मान्सूनला आणखी वेग देणार आहे.

तमिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये अधिक मुसळधार पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने या ठिकाणी ऑरेंज आल्यावर ते दारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे. पुढील 24 तासात आंध्र प्रदेश, ओडिशा, मणिपूर, मिझोरम आणि नागालँड मध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. या राज्यांमध्ये ढगांच्या गडगडाटी सह वादळी आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, पुढील 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरातील वारे अधिक तीव्र होणार आहेत. त्यामुळे एक लहान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. याप्रमाणे किनारपट्टी भागात 100 ते 150 mm पर्यंत पाऊस पडू शकतो. आंध्र, ओडिसा आणि तमिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तर महाराष्ट्र मध्ये राज्यातून मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी या प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम काही भागांमध्ये जाणू शकतो. याच पार्श्वभूमी वरती विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर काही हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली लवकरच कमी होईल आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर देशभरात तापमान वाढू लागेल. पण तो वर नागरिकांनी सावध रहाणे गरजेचे आहे किनारी भागात राहणाऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचा पालन करावा असा सल्ला देखील दिला आहे.

हे पण वाचा | Weather Alert | राज्याच्या वातावरण पुन्हा एकदा मोठा बदल, हवामान खात्याचा या 21 जिल्ह्यांना अलर्ट

Leave a Comment