Weather Update: राज्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याबाबत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. Weather Update
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यातील भागात ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज
कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या तीन दिवसात कमल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि उडीसाच्या किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या नैऋत्य भागाकडून चक्री वारे वाहत आहे त्यामुळे तामिळनाडू पर्यंत या वाऱ्याचा प्रभाव दिसून येत आहे. हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कारणामुळे मध्य व पूर्व भारतात वाऱ्याच्या एकीकरणाच्या प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
हे पण वाचा | उन्हाळी कांद्याला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या कांदा बाजार भाव
दरम्यान 24 तासात अकोला येथे देशातील उच्चांक 41.1°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर जेऊर ब्रह्मपुरी अमरावती वर्धा आणि चंद्रपूर येथे तापमान 40 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. धुळे मालेगाव परभणी गडचिरोली नागपूर वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी 39 डिग्री अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान नोंदवले आहे. दरम्यान पुण्यात शुक्रवारी किमान तापमान 19 अंश डिग्री सेल्सिअस आणि कमाल तापमान 37°c इतके आहे. पुण्यामध्ये संध्याकाळ नंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “राज्यातील या पाच जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासोबत पावसाचे अलर्ट; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज”