सोन्याच्या किमतीने रचला इतिहास! सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या वर पोहोचले; जाणून घ्या आजचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज, 14 जून 2025 रोजी, या वाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येत आहे, ज्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

हे पण वाचा| कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ; जाणून घ्या कांद्याचे दर..

सोन्याने ओलांडला 1 लाख रुपयांचा टप्पा!

आज सोन्याचा भाव 1 लाखांच्या पुढे गेला आहे, ही भारतीय बाजारातील एक मोठी घडामोड आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने एका दिवसात 50 ची वाढ नोंदवत कॉमेक्सवर 3440 प्रति औंसचा टप्पा गाठला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर 3 टक्क्यांनी महागले आहेत. Gold Rate Today

घरगुती वायदे बाजारात म्हणजेच MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. सकाळी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,950 रुपयांनी वाढून 92,950 प्रति 10 ग्रॅम इतका झाला. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 2,120 रुपयांनी वाढून 1,01,400 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 1,590 रुपयांनी वाढून 76,050 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

हे पण वाचा| महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार पुनरागमन: पंजाबराव डखांचा या जिल्ह्यांना ‘अलर्ट’; जिल्ह्यांची यादी इथे पहा

चांदीही तेजीत, रेकॉर्डब्रेक वाढ!

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. MCX वर चांदी 557 रुपयांच्या तेजीसह 1,06,442 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. इंट्राडेमध्ये चांदीने 1,06,799 प्रति किलोग्रॅमचा उच्चांक गाठला होता. काल चांदी 1,05,885 रुपयांवर स्थिरावली होती.

आजचे सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)

  • 22 कॅरेट: 9,295 रुपये
  • 24 कॅरेट: 10,140 रुपये
  • 18 कॅरेट: 7,605 रुपये

हे पण वाचा | राज्यातील शाळा कधी सुरू होणार: 16 जून की 23 जून? पालकांमध्ये संभ्रम कायम!

आजचे सोन्याचे दर (प्रति 8 ग्रॅम)

  • 22 कॅरेट: 74,360 रुपये
  • 24 कॅरेट: 81,120 रुपये
  • 18 कॅरेट: 60,840 रुपये

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

  • 22 कॅरेट: 92,950 रुपये
  • 24 कॅरेट: 1,01,400 रुपये
  • 18 कॅरेट: 76,050 रुपये

हे पण वाचा| शेतकऱ्यांनो, पावसाची वाट पाहताय? हवामान खात्याचा ‘हा’ धक्कादायक अंदाज नक्की वाचा

या अभूतपूर्व वाढीमुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ महत्त्वाचा ठरत आहे. जागतिक अस्थिरता असेच राहिल्यास सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

1 thought on “सोन्याच्या किमतीने रचला इतिहास! सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या वर पोहोचले; जाणून घ्या आजचे दर”

Leave a Comment

error: Content is protected !!