Maharashtra Weather Forecast 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या संकटाचा काळ कोसळलेला आहे. यंदा मान्सून ने शेतकरी राजाला अपेक्षेप्रमाणे साथ दिलेली नाही, हे आता स्पष्ट झाल आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सप्टेंबर चे पहिले आठवड्यात एक छोटासा दिलासा मिळण्याची शक्यता समोर आलेली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात चार ते पाच सप्टेंबर या दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भात आणि उत्तर मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. मात्र येथे एक महत्त्वाचा इशारा आहे हा जोर फार काळ टिकणार नाही, आणि दहा ते 24 सप्टेंबर या पदीर्घ कालावधीत राज्यात पुन्हा एकदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Forecast 2026
गेल्या काही दिवसांपासून नुसत्या अंदाज समोर येत आहेत परंतु आकडेवारी आणि पावसाची स्थिती खरं चित्र समोर आणते. मराठवाड्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल 27% कमी पाऊस नोंदवला गेला आहे. तर विदर्भात 24 टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे ही तुट एका महिन्याची नाही तर जून जुलैमध्येच पावसाने पाठ फिरवली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात अपेक्षित हजेरी लागली नाही. म्हणजे सलग तीन महिने या दोन्ही विभागात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सप्टेंबरमधील अवघ्या दोन-तीन दिवसाच्या पावसाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिल आहे.
तात्काळ परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आजच जाणवण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे, तर राज्याच्या उर्वरित भागांत ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे.
२७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत पूर्व भारतात चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे, आणि याच विस्तृत कालावधीतल्या ४-५ सप्टेंबर या दोन दिवसांत मध्य भारत, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यालाही त्याचा फायदा मिळू शकतो. मात्र १० सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण घटण्याचा अंदाज आहे. यामुळे एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो तीन महिन्यांची, २४ ते २७ टक्क्यांची खोलवर रुजलेली तूट, अवघ्या दोन-तीन दिवसांचा पाऊस खरंच भरून काढू शकेल का? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे आणि याच अनिश्चिततेमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
(टीप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजावर आधारित आहे. अद्ययावत व स्थानिक इशाऱ्यांसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)
हे पण वाचा : 12 आणि 13 नोव्हेंबरला मोठ हवामान संकट; हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घ्या
