Pm Kisan Yojana | शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी Good news समोर आलेली आहे. कारण एक महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे तो म्हणजे हप्त्याबाबत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमधून सातत्याने एकच प्रश्न विचारला जात होता आमच्या खात्यावरती या योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार? परंतु आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही कारण, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे तर चला जाणून घेऊया हा हप्ता कधी जमा होणार याची सविस्तर माहिती. Pm Kisan Yojana
अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमधून एक चर्चा ना उद्यान आलं होतं की आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार? तसं पाहायचं झालं तर 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आला होता आणि पुढील हप्त्याचे आतुरतेने शेतकरी आता वाट पाहत आहेत. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, काही राज्यातील शेतकऱ्यांना २१ वा हप्ता मिळालेला आहे यामध्ये पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
हा हप्ता शेतकऱ्यांना एक मदत म्हणून देण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अशीच काही परिस्थिती महाराष्ट्रात देखील निर्माण झालेली आहे. दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा केला जाईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता.
परंतु दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही. परंतु शेतकरी म्हणतात दिवाळी झाली आता आम्हाला हप्ता कधी मिळणार मिळणार की नाही? का योजना बंद झाली आहे तर विचार करायचा म्हटल्यावर ही योजना बंद झालेली नाही या योजनेचा पुढील हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरात मिळू शकतो.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या चालू आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे असा दावा एक मोठ्या मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांनो आम्ही सांगू इच्छितो की याबाबत अजून कुठलाही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही त्यामुळे या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल हा असा दावा आहे. परंतु जर या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाल्यास नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा | PM किसानचा 20वा हप्ता हुकणार? ‘ही’ 5 कामं केली नसतील तर लगेच करा..
