रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातून धावणार नवीन दोन एक्सप्रेस वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण आता पुणे आणि कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. हडपसर हरंगुळा या मार्गावरती प्रवास करणाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आतापर्यंत विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या या दोन गाड्या आता नियमित दैनिक एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला असून यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक नियमित आणि दररोज रेल्वेचा लाभ मिळणार आहे. तर याची सविस्तर माहिती जाणून घ्या. Railway News

हडपसर-हरंगुळ गाडी आजपासूनच दैनिक सेवेत दाखल

‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत आतापर्यंत विशेष स्वरूपात धावणारी हडपसर-हरंगुळ ही गाडी १५ ऑगस्टपासून ‘११४२९/११४३० हडपसर-हरंगुळ-हडपसर एक्स्प्रेस’ या नव्या क्रमांकासह दररोज धावू लागली आहे. गाडी क्रमांक ११४२९ ही हडपसरहून सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १ वाजता हरंगुळला पोहोचेल. परतीची ११४३० ही गाडी हरंगुळहून दुपारी ३ वाजता सुटून रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी हडपसरला परत पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड, कुर्डुवाडी, बार्शी आणि धाराशिवसह मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

पुणे-कोल्हापूर गाडी २० ऑक्टोबरपासून दैनिक होणार

दुसऱ्या टप्प्यात, पुणे-कोल्हापूर ही गाडीही येत्या २० ऑक्टोबरपासून ‘११४१९/११४२० पुणे-कोल्हापूर-पुणे दैनिक एक्स्प्रेस’ या नावाने नियमित सेवेत रूपांतरित होणार आहे. गाडी क्रमांक ११४१९ पुण्याहून रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुटून पहाटे ५ वाजून ८ मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल. परतीची ११४२० ही गाडी कोल्हापूरहून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी सुटून पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबतही महत्त्वाची मागणी

रेल्वेसंदर्भातील याच बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या मूळ मार्गानेच व्हावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली असून, याबाबत त्यांनी थेट पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांना माहिती दिल्याचं सांगितलं. यासोबतच स्थानिक पातळीवर रेल्वे खात्याने अधिक सहकार्य करावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अनधिकृत प्रवेशमार्ग तात्काळ बंद करण्याचीही मागणी त्यांनी यावेळी नोंदवली

(टीप: वरील वेळापत्रक मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीवर आधारित आहे. प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा NTES अॅपवर ताजी माहिती पडताळून घ्यावी.)

हे पण वाचा : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! पुढील आठवडाभर या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस…

Leave a Comment

error: Content is protected !!