Pm किसान योजनेचा हप्ता या तारखेला होऊ शकतो जमा? पहा सविस्तर माहिती | Pm Kisan Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan News : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याची वाट पाहत असाल तरी बातमी नक्की पहा आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती Pm Kisan योजनेचा हप्ता जमा होणार अशी बातमी समोर आलेली आहे. परंतु हफ्ता खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का? कारण शेतकऱ्यांवरती आता संकटाचा काळ कोसळलेला आहे. शेतीचा वाढता खर्च, अनेक भागांमध्ये पडलेली पावसाची तूट आणि समोर आलेला सणासुदीचा काळ अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणारे दोन हजार रुपये शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे 24 व हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. Pm Kisan News

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी वर्षाला सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी हप्त्यात दोन हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 23 हप्ते वितरित झाले असून आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

24 वा हप्ता कधी येणार?

मिळालेल्या माहितीनुसार,  23 वा हप्ताह 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता. आता पुढील हप्ताह या योजनेच्या नियमानुसार चार महिन्याच्या अंतराने जमा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे 24 वा हप्ता ऑगस्ट किंवा नोव्हेंबर या कालावधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र सरकारने याबाबत अजून कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही, त्यामुळे ठराविक तारीख आपण ग्राह्य धरू शकत नाही. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये सणासुदीचे दिवस जवळ येत असताना हा हप्ता लवकर मिळावी अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे. मात्र किंवा सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हाट्सअप वरील मेसेज वर विश्वास ठेवणे ऐवजी अधिकृत अपडेटची वाट पाहणे गरजेचे आहे.

राज्यात यंदा परिस्थिती थोडीशी बिकटच होत चालली आहे. कारण पावसाची पडलेली तूट सुरुवातीला पेरणी झालेली उशिर नाही. आता पीक खराब होते का काय या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. गौरी गणपती उत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे मोठे सण समोर येत आहे. आता हा हप्ता कधी जमा होतो हे पाहणे गरजेचे आहे.

मात्र हप्ता मिळण्यासाठी ही कामे पूर्ण असणे गरजेचे

तुम्हाला 24व्या हप्त्याची रक्कम कोणत्याही अडचणीशिवाय मिळवायची असेल, तर काही महत्त्वाच्या बाबी आधीच तपासून घ्या.

ई-केवायसी पूर्ण आहे का? : तुमच्या पीएम किसान खात्याची e-KYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. e-KYC अपूर्ण असल्यास हप्ता अडकण्याची शक्यता असते.

आधार-बँक खाते लिंक आहे का? : तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि DBT सुविधा सक्रिय असणे महत्त्वाचे आहे.

लँड सीडिंग पूर्ण आहे का? : जमिनीची नोंद आणि लँड  सीडिंगशी (Land seeding)  संबंधित पडताळणी पूर्ण झाली आहे का, हे देखील तपासा. या तिन्ही बाबींमध्ये अडचण असल्यास हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.

मोबाईलवर हप्त्याची स्थिती कशी तपासायची?

शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली स्थिती तपासू शकतात. सर्वप्रथम PM-Kisan च्या अधिकृत पोर्टलवर जा. त्यानंतर Farmers Corner मधील Know Your Status या पर्यायावर जा. येथे आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमच्या खात्याची स्थिती तपासता येईल. तसेच Beneficiary List मध्ये जाऊन राज्य, जिल्हा, तालुका/ब्लॉक आणि गावाची माहिती निवडून लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, हेही तपासता येते.

हे पण वाचा : तुमचा Pm किसान योजनेचा हप्ता बंद झालाय का? या पद्धतीने पुन्हा सुरू करा PM किसान योजनेचा हप्ता

Leave a Comment

error: Content is protected !!