सोन्याचे नवीन बाजार भाव आले समोर! पहा नवीन बाजार भाव Gold Rate Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या 24 दिवसांमध्ये सोन्याच्या दरात( Gold Rate) 20 हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरात देखील याच काळामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, गेल्या फक्त पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात आठ हजार रुपयांची वाढ झाली आहे. आणि आता ह्याच दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे आणि लवकरच सोन एक लाख 70 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकता असा अंदाज सध्या तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तर याच दरवाढीचा फटका हा सणसुदीच्या मुहूर्तावरती सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे तर आजचा दर काय हे आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Gold Rate Today

नेमकं वाढ किती झाली ?

आजचे आकडेवारीचा अंदाज घेता. तीन ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार 291 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. मात्र अवघ्या 24 दिवसानंतर 24 ऑगस्ट रोजी हाच दर 1 लाख 63 हजार 970 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे या कालावधीत सोन्यान जवळपास 21 हजार 679 रुपयांची झेप घेतली आहे. 24 कॅरेट सोन्याप्रमाणेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे.

हे पण वाचा : सोन्या चांदीचे भाव घसरले; नवीन शहरानुसार दर काय आहेत पहा!

तसेच या वर्षांमधील सोन्याचा सर्वोच्च दर लक्षात घेण्यासारखा आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (MCX) 29 जानेवारी रोजी सोन्याने एक लाख 93 हजार रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. सध्याचा दर त्याच उच्चांकी तुलनेत अजूनही काहीसा कमी असला, ऑगस्टमधील ही सलग आणि वेगवान दरवाढ पाहत असून पुन्हा एकदा त्या दिशेने सोने वाटचाल करत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याने प्रत्यक्ष दागिने किंवा गुंतवणूक खरेदी साठी सोन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषता सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि लग्नसराई हंगाम सुरू होणार आहे त्यापूर्वी गरीब कुटुंबातील नागरिकांना हा दरवाढीचा फटका मोठा बसणार आहे. हिंदू धर्मामध्ये सणासुदीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केले जाते. परंतु आता हाच दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार हे नक्की आहे.

( टिप : वरील दर हे सांकेतिक असून बाजारातील उपलब्ध आकडेवारी आधारित आहेत. प्रत्यक्ष खरेदीपर्वी स्थानिक सर्व बाजारातील दर पडताळून घ्या. ).

Leave a Comment

error: Content is protected !!