Ladki Bahin Yojana Scheme Installment : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना असून, पात्र असणाऱ्या लाभार्थी महिला गेल्या काही काळापासून याच हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. Ladki Bahin Yojana Scheme Installment
खरंतर सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, रक्षाबंधनापूर्वी महिलांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने समाधान व्यक्त केल जात आहे. सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 344 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्यानंतर, जुलै महिन्याच्या हप्तायच प्रत्यक्ष वितरण सुरू करण्यात आल आहे.
राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधरावी, यासाठी एक मदतीचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम जुलै 2024 मध्ये सुरू केला होता. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना निवडणूक पूर्वी महायुती सरकारने मोठा लाभ दिलाय त्यामुळे त्यांना मोठे यश मिळाले होते.
तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एक मोठी होती परंतु आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार योजना सुरू झाली तेव्हा संख्या दोन कोटी 47 लाख इतकी होती त्यानंतर राज्य सरकारने केवायसी प्रक्रिया राबवली. त्यानंतर तब्बल 62 लाख महिलांचे नाव यादी मधून वगळण्यात आल आहे. इतरही काही कारणामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घट झाली असून सध्या इ – kyc पात्र लाभार्थ्यांची एकूण संख्या 1 कोटी 65 ला किती आहे. म्हणजे सुरतीच्या तुलनेत तब्बल 92 लाख लाभार्थी कमी झाले आहेत.
जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि सणासुदीपूर्वी हा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याने नक्कीच महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
( टिप: वरील माहिती राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेवर आणि माहिती अधिकृत समोर आलेल्या आकडेवारीवर आधारित आहे. तुमच्या हप्त्याच्या स्थितीबाबत अचूक माहितीसाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)
हे पण वाचा : लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..
