Maharashtra Weather Update Ashok Todkar : राज्यामध्ये सध्या परिस्थिती जास्त बिकट होत चाललेली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे आलेले पीक देखील वाळून चाललेले आहे. आणि काही ठिकाणी उडीद, सोयाबीन अशा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नामांकित आणि शेतकऱ्यांचे विश्वासू हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होईल आणि हे आगमन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. सध्याची स्थिती आणि पुढील काही दिवसातील बदल याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर अंदाज. Maharashtra Weather Update Ashok Todkar
अशोक तोडकर यांचा हवामान अंदाज
अशोक तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 आणि 26 ऑगस्ट या दोन दिवसात विदर्भसह राज्याचा काही भागात पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, पूर्व मराठवाडा, खानदेश, नाशिक, सोलापूर आणि धाराशिव या भागात दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी ठीक ठिकाणी पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे.
राज्यातील हवामानावर सध्या पश्चिमेवारांचा प्रभाव कायम असून, हा जोर पुढील सहा ते सात दिवस असाच टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक विचित्र असमानता निर्माण झाल्यास उत्तर भारत मध्ये प्रदेशात सध्या चांगला पाऊस पडत असताना दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मात्र पावसाची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या भागात पावसाची तूट अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
आता सर्वात महत्त्वाची दिलासादायक बातमी म्हणजे तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधी एक आशादायक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. एक ते चार सप्टेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. GFS या हवामान मॉडेल नुसार, हे सर्कुलेशन ओडिसा आणि तेलंगाना मार्गे विदर्भ आणि महाराष्ट्राच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता तोडकर यांचा हवामान अंदाज आणि हवामान खात्याचा अंदाज किती खरा ठरतो याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा : 15 जून 2025 पासून पावसाचे रूप बदलणार: पंजाबराव डख यांचा अचूक हवामान अंदाज..
