अवकाळी पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीस; शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करावी का?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Awakali Rain : “आमचं सगळं काम मे महिन्यात होतं हो… पण या पावसानं हातातलं सगळं काम उध्वस्त केलं.” असं सांगताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. गेल्या आठवडाभरापासून सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची अवस्था अशीच झाली आहे. नांगरणी थांबली, खत टाकायचं राहिलं, बांधबंदिस्त काम पूर्ण होईना. त्यामुळे खरीप हंगामाचा पहिला टप्पाच गडबडला. Awakali Rain

मे महिना म्हणजे शेतकऱ्याच्या कामाचा कळस. मृग नक्षत्र सुरु होईपर्यंत जमिनीत जीव टाकण्यासाठीची ही शेवटची वेळ. पण या वर्षी मे महिन्यातच ढगाळ वातावरण, वादळं आणि अचानक पडणारा मुसळधार पाऊस यामुळे जमिनीतला तो “ताप”च राहिला नाही. परिणामी, पुढच्या महिन्यात लागवड केली तरी उगवण नक्की होईल याची खात्री उरलेली नाही.

रब्बी पिकांचेही नुकसान, उन्हाळी हंगाम वाया

“माझं अद्याप कांद्याचं पीक उभं होतं. पाच एकरवर होतं. पण पावसाने मुळं सडली. आता त्याला कोण बाजार भाव देणार?” असं सांगत शेतकऱ्यांच्या आवाजात प्रचंड नैराश्य जाणवत होतं. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात जास्त पीक घेतलं, पण आता त्या पिकांचीच चाळण झाली आहे. मका, कलिंगड, कांदे या उन्हाळी पिकांचीही चांगलीच वाट लागली आहे.

शेतकरी अडचणीत, तरीही आशा जिवंत

या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही काही शेतकरी खरीप हंगामाकडे आशेने पाहत आहेत. यंदा कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असं वाटतंय म्हणून शेतकऱ्यांनी तुरीपासून थोडं दूर जात या नगदी पिकांकडे वळायला सुरुवात केली आहे. पण… या वाटचालीत पुन्हा एखादा पाऊस आला तर? तेव्हा शेतकरी पुन्हा मूठभर माती हातात घेऊन नुसतं आकाशाकडे पाहत राहणार…

सरकारकडून मदतीची वाट पाहणारे डोळे

“मदतीचे आश्वासन आम्ही अनेक वेळा ऐकलेत, पण आता खरंच काही झालं पाहिजे.” असं जिल्ह्यातील अनेक शेतकरी सांगतात. खरं तर हे नुकसान केवळ पिकांचं नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनोबलाचंही आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीचं भविष्य नेहमीपेक्षा अधिक अनिश्चित झालं आहे.

हे पण वाचा | आता राज्यात इतके दिवस अवकाळी पाऊस पडणार? पंजाब रावांचा नवीन अंदाज

Leave a Comment